Online Fraud : सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करणाऱ्या 40 टक्के भारतीयांसोबत फसवणूक होतेय. एका अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे. ग्लोबल लीडर नॉर्टन यांच्या मार्फत ऑगस्ट 2022 मध्ये भारतामध्ये एक ऑनलाईन सर्वे केला आहे. याचा आज खुलासा करण्यात आला आहे. नॉर्टनलाइफ लॉकसाठी द हॅरिस पॉल यांनी 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या 1001 भारतीय लोकांची मते जाणून घेतली. यामध्ये सणासुदीच्या काळात सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन शॉपिंग सदंर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेमध्ये ऑनलाइन खरेदी करताना कोणती सावधानता बाळगायला हवी, याबाबतची माहिती दिली आहे. सर्वेनुसार, 2022 मध्ये 61 टक्केंनी सणसुदीच्या काळात खरेदी करण्यासाठी पसंदी दर्शवली आहे.
सणासुदीच्या काळात कुटुंबातील सदस्य अथवा नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी अनेकजण खरेदी करतात. सर्वेमध्ये सामील असणाऱ्या भारतीयांनी सणासुदीच्या काळात भेटवस्तू देण्यासाठी तंत्रज्ञानाशी निगडीत गॅझेट्स खरेदीची योजना केली. यामध्ये 64 टक्के लोकांनी स्मार्टफोन्सला पसंदी दर्शवली. तर 55 टक्केंनी स्मार्टवॉच आणि 47 टक्केंनी स्मार्ट होम डिव्हाइसला पसंदी दर्शवली.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या काळात 8 टक्के कमी भारतीयांनी टॅक्नोलॉजी गॅझेट्स खरेदी करण्याला पसंदी दर्शवली. यंदापेक्षा गेल्यावर्षी सणासुदीच्या काळात गॅझेट्सची खरेदी जास्त झाली होती. यंदा भेटवस्तू देण्यासाठी गॅझेट्स खरेदी कऱणाऱ्या पाच पैकी चार जणांच्या मते वाढत्या महागाईमुळे खरेदी केली नाही. सर्वेमध्ये सामील असणाऱ्यांपैकी 91 टक्केंनी भेटवस्तू देताना खर्च कमी कऱण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. टेक्नोलॉजी उत्पादनावर आकर्षक सूट असल्यामुळे 36 टक्केंनी तर एकूण बिलावर सूट असल्यामुळे 29 टक्केंनी फेक लिंक्सवर क्लिक केल्याचं कबूल केलं.
नॉर्टनचे डायरेक्टर रितेश चोप्रा यांनी नॉर्टन लाईफ लॉकमध्ये म्हटले की, सणासुदीच्या काळात कुटुंबिय अथवा मित्रांना भेटवस्तू देण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग केली जाते. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन शॉपर्सची संख्या मोट्या प्रमाणात वाढली आहे. त्यासोबतच ऑनलाईन शॉपिंग स्कॅम, गिफ्ट कार्ड आणि पोस्ट डिलिवरीमध्ये फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक भारतीय ऑनलाईन खरेदी करताना फसवणुकीचे शिकार होत असल्याचं आमच्या सर्वेमध्ये समोर आलेय. सर्वेमध्ये सामील असणाऱ्या लोकांचं सरासरी 6216 रुपयांचं नुकसान झाले आहे. पण हेही तितकेच खरे आहे की, अनेकजणांना ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात माहिती आहे. त्यांची फसवणूक होत नाही, कारण ते सर्व काळजी घेतात. तरिही ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अनेक गोष्टीमध्ये बदल होणं गरजेचं आहे.
सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करणाऱ्या दोन तृतियांश भारतीयांना खालील प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.
वैयक्तिक तपशीलाशी तडजोड करण्यात आली (78%)
तृतीय-पक्ष किरकोळ विक्रेत्याच्या फसवणुकीला बळी पडले (77%)
अनवधानाने बनावट गिफ्ट मिळाले (76%)
दुसर्यासाठी खरेदी केलेले डिव्हाइस डिजिटली असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले (75%)
हॉलीडे ट्रॅव्हल अथवा राहण्याची सोय घोटाळेबाजाने उद्ध्वस्त झाली (73%)
भेट म्हणून दुरुस्त केलेले डिव्हाइस प्राप्त झाले. (72%)