Wikipedia: गुगलवर आपण काहीही सर्च करायला गेलं तर पहिलं पेज ओपन होतं ते विकिपीडियाचे. आज त्याच विकिपीडियाचा जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी 2001 साली जिमी वेल्स आणि लॅरी सॅंगर यांनी विकिपीडियाची सुरुवात केली होती. हे पेज सुरु करताना जगातील कोणीही व्यक्ती यामध्ये एडिट करु शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. टेक्नॉलॉजीच्या जगतात अशा प्रकारच्या एकत्रित करण्यात आलेल्या माहितीला क्राउड सोअर्सिंग म्हणतात.
विकिपीडियाची सुरुवात करण्यापूर्वी जिमी वेल्स आणि लॅरी सॅंगर यांनी न्यूपीडिया नावाचा एक एनसायक्लोपीडिया सुरु केलं होतं. यावर जगभरातील तज्ज्ञ लोक लेख लिहायचे आणि तो लेख पूर्णपणे तपासल्यानंरच प्रकाशित केला जायचा. त्यानंतर या जोडगोळीने विकिपीडियाची सुरुवात केली. सुरुवातीला विकिपीडियावर यूजरना एडिट करण्याची सोय उपलब्ध नव्हती. पण काही काळानंतर यात प्रत्येक यूजरला एडिटचा ऑप्शन मिळाला.
हवाईयन भाषेत विकी म्हणजे क्विक, तत्काळ. आज विकिपीडिया ही जगातली 13 व्या क्रमांकाची लोकप्रिय वेबसाइट आहे. सुरुवातीच्या एका वर्षात या पेजवर 18 विविध भाषांत 20 हजार लेख लिहण्यात आले. आताच्या घडीला या पेजवर सुमारे 55 दशलक्ष लेख तेही 300 विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
मराठी भाषा दिनानिमित्त अमेरिकन दूतावासात मराठीचा जागर
जगातील 300 पेक्षा जास्त भाषेत सुविधा
विकिपीडिया आज जगातील 300 पेक्षा जास्त भाषांत उपलब्ध आहे. 2003 साली विकिपीडियाने हिंदी भाषेत सेवा उपलब्ध करुन दिली. एका अहवालानुसार विकिपीडियावर दर मिनीटाला 350 वेळा एडिट केलं जातं तर दर सेकंदाला आठ हजारवेळा वाचलं जातं. दर महिन्याला 2.2 अब्ज यूजर्स विकिपीडियावर भेट देतात.
विकिपीडिया आणि विवाद
कोणतीही व्यक्ती विकिपीडियावरल जाऊन आपल्याला हवी ती माहिती एडिट करु शकते. त्यामुळे अनेकदा एखाद्या व्यक्ती वा समाज, धर्म किंवा देशाबद्दलही आपत्तीजनक माहिती अपलोड केली जाते. त्या माहितीची खातरजमा करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे विकिपीडिया अनेकवेळा वादात सापडलंय. आपल्या देशातही अनेकवेळा तशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात. अनेक नामांकित व्यक्तींच्या विकिपीडियातील प्रोफाइलमध्ये बदल करण्यात येतात आणि नंतर त्यांची बदनामी करण्यात येते.
आजच्या युगात फेसबुक किंवा गुगल सारख्या मोठ्या कंपन्या आर्थिक फायद्यामागे धावत असताना विकिपीडिया मात्र जगभरातील ज्ञान लोकांना मोफतपणे वाटतंय हे विशेष. आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा वाढदिवस आपण लक्षात ठेवतो आणि साजरा करतोय. म्हणूनच विकिपीडियालाही आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत.