OnePlus Smartphone : OnePlus 8, OnePlus 8 Pro, OnePlus 8T आणि OnePlus 9R ला Android 12 वर बेस Oxygen OS 12 अपडेटचे स्टेबल व्हर्जन मिळत आहे. Oxygen OS 12 अपडेट OnePlus स्मार्टफोनमध्ये अनेक Android 12 फीचर्स आणणार आहे. जसे की, डार्क मोड, वर्क-लाइफ बॅलन्स (WLB) 2.0 आणि इतर. OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro एप्रिल 2020 मध्ये लॉन्च केले गेले. OnePlus 8T ऑक्टोबर 2020 मध्ये लॉन्च झाला होता, तर OnePlus 9R मार्च 2021 मध्ये लॉन्च झाला होता. दोघांना Android 11 आउट-ऑफ-द-बॉक्स मिळाला.
OnePlus फोरमवरील वेगवेगळ्या पोस्टनुसार, OnePlus फ्लॅगशिप स्मार्टफोन आता भारत आणि उत्तर अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी Android 12-बेस OxygenOS 12 अपडेटचे स्टेबल व्हर्जन प्राप्त करत आहेत. OnePlus 8, OnePlus 8 Pro, OnePlus 8T, आणि OnePlus 9R ला अपडेटसह अनेक Android 12 फीचर्स मिळतील.
नवीन Android 12 फीचर्स चारही OnePlus स्मार्टफोनसाठी OxygenOS 12 अपडेटमध्ये सारखीच आहेत. यामध्ये ऑप्टिमाइझ केलेल्या डेस्कटॉप आयकॉनसह येणारी सिस्टीम अपडेट्स तसेच बॅकग्राउंड ऍप्लिकेशन्स, लेन्स परवानग्या आणि नोटिफिकेशन्स प्राप्त करताना प्रतिसाद न देणार्या स्क्रीन्सच्या असामान्य बंद करण्याच्या सुधारणांचा समावेश आहे.
अपडेट शेल्फ कार्डसाठी अतिरिक्त स्टाइलिंग पर्याय देखील आहे. शेल्फला ब्लूटूथ इयरफोनसाठी एक-क्लिक एड्जस्टमेंटसह इअरफोन कंट्रोल कार्ड देखील मिळते.
WLB आता क्विक सेटिंग्जमध्ये यूजर्ससाठी उपलब्ध असेल. WLB 2.0 आता जागा, वाय-फाय नेटवर्क आणि वेळेवर आधारित स्वयंचलित वर्क/लाइफ मोड स्विचिंगला समर्थन देईल.
महत्वाच्या बातम्या :
- Google Doodle : गुगलने डूडलद्वारे दिल्या 'नवरोझ'च्या शुभेच्छा, पारशी नववर्षाबद्दल जाणून घ्या...
- Netflix : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर कराल तर... , कंपनी आणणार नवीन फिचर
- Google Maps crashes : गूगल मॅपच 'भटकलं', अनेकांना रस्ता शोधण्यात अडचण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha