Oneplus 10 pro : सध्या स्मार्टफोन्सच्या (SmartPhones) युगात जितके अधिक फिचर्स मोबाईलमध्ये असतात तितकी त्याला विकत घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे दर महिन्याला बाजारात नवनवीन फिचर्ससह फोन येत असतात. यात स्मार्टफोन्स तयार करणारी आघाडीची कंपनी वनप्लसने (OnePlus Mobile) वर्षाच्या सुरुवातीलाच वनप्लस 10 प्रो (Oneplus 10 pro) लॉन्च केला. 11 जानेवारी रोजी हा फोन लॉन्च झाला. वनप्लस कंपनीच्या वनप्लस 9 प्रो या मॉडेलचं (OnePlus 9 Pro) विकसित मॉडेल आहे. तर वनप्लस 10 प्रो हा फोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह 6.7 इंच क्वॉड एचडी प्लस अमोल्ड डिस्प्लेमध्ये उपलब्ध आहे. या फोननंतर आता कंपनी पुढील मॉडेल काम करत असून वनप्लसचा One Plus Ultra लवकरच कंपनी लॉन्च करणार आहे.


या फोनमध्ये अधिक भारी आणि आधुनिक फिचर्स कंपनी देणार असल्याचे समोर येत आहे. ज्यात कॅमेरा एक सर्वात मोठी गोष्ट असणार आहे. कंपनी ओप्पो (Oppo) कंपनी त्यांच्या आधुनिक फोन्समध्ये वापरत असलेली MariSilicon Chipset बसवणार आहे. ज्याने फोनची कॅमेरा क्वॉलीटी आणखी सुधारणार आहे. वन प्लस अल्ट्रा या वर्षीच्या अखेरपर्यंत बाजारात लॉन्च होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट येत आहेत.



हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha