मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलचे अवघे दोनच दिवस उरले आहेत. आज या सेलचा चौथा दिवस आहे. मागील तीन दिवसात अनेकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. आज देखील या सेलमध्ये अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत.


या आहेत आजच्या खास ऑफर:     

टीसीएल 139.7 इंच (55 इंच) 4के स्मार्ट एलईडी टीव्ही: या टीव्हीवर बरीच सूट देण्यात आली आहे. रु. 48990, किंमतीच्या या टीव्हीवर तब्बल 3000ची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा टीव्ही आता रु. 45,990 खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग ऑन 5 प्रो: या स्मार्टफोनवर तब्बल 35 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. रु. 9190 रुपयांचा हा स्मार्टफोन रु. 7990 मध्ये तुम्ही खरेदी करु शकता.

केनस्टार 17 लीटर मायक्रोवेव्ह ओव्हन: या ओव्हनवर देखील भरघोस सूट देण्यात आली आहे. या ओव्हनची बाजारात किंमत रु. 5990  आहे. पण या ऑफरमध्ये आता हा ओव्हन रु. 3890ला खरेदी करता येणार आहे.

डेल इंस्पिरॉन 11.6 लॅपटॉप: या लॅपटॉपवर 11 टक्के सूट देण्यात आली आहे. बाजारात या लॅपटॉपची किंमत रु. 16,499 आहे. मात्र या ऑफरमध्ये हा लॅपटॉप रु. 14,749 उपलब्ध आहे.

निकॉन डी3400 कॅमेरा: 18-55 एमएम लेन्स असणाऱ्या या कॅमेऱ्यावर बरीच सूट देण्यात आली आहे. रु. 36,950 किंमतीचा हा कॅमेरा रु. 28,990 किंमतीला उपलब्ध आहे.

सोलिमो नॉनस्टिक 3-पीस किचन सेट: या किचन सेटवर अमेझॉन सेलमध्ये तब्बल 62 टक्के सूट मिळणार आहे. 2630 रुपयांचा हा किचन सेट तुम्हाला 999 रुपयात मिळणार आहे.