मुंबई : जगातील अग्रगण्य GPU कंपनी Nvidia ने ड्रायवरशिवाय कारसाठी नवं मॅप सॅाफ्टवेअर लॅान्च केले आहे. हे नवं सॅाफ्टवेअर रस्त्याची समुद्रसपाटी पासूनची उंची, पथचिन्हे, सिग्नल आणि रस्त्यालगतच्या उभ्या रेषा अगदी अचूकपणे दर्शविते असा दावा Nvidia कंपनीने केला आहे.
 
हे सॅाफ्टवे्अर कारमधील सेन्सरचा वापर करून प्रतिकुल हवामानात किंवा कमी दृष्यमानतेमध्ये सुध्दा रस्ता दर्शविण्यास सक्षम आहे. तसेच ठराविक क्षेत्रातील नकाशाच्या अभावावेळी सभोवतालच्या परिसरासंदर्भात माहिती एकत्रित करून हे सॅाफ्टवेअर योग्य दिशा दाखवण्यास सक्षम असल्याचा दावा ही कंपनीने केला आहे.


मागील वर्षी deepmap हे हाय डेफिनेशन मॅपिंग स्टार्टअप विकत घेतल्यानंतर Nvidia नी हे सॅाफ्टवे्अर आणले आहे. DeepMap च्या अचूक सर्वेक्षणातून आणि Nividia च्या Hyperion Architecture वापरणाय्रा गाड्याच्या माध्यमातून गोळा केलेल्या डेटावर हे सॅाफ्टवेअर आधारित असून काही सेंटीमिटरपर्यंत एवढा अचूक डेटा हे मॅपिंग सॅाफ्टवेअर आपल्याला देईल. अधिकाधिक अचूकतेसाठी सॅाफ्टवेअर तीन महत्वाच्या गोष्टींवर आधारित आहे, कॅमेरा, लायडर (lidar) आणि रडार. 


यातील lidar layer हा परिसराचे 5 सेंटीमिटर रिसोल्युशन पर्यंत 3D माॅडेल बनवण्यास मदत करतो असे NVIDIA चे म्हणणे आहे. हा AI वर आधारित मॅप कार्सच्या सहाय्याने आणि सातत्याने डेटा संकलित करत असतो, पुढे हा डेटा क्लाऊड मध्ये अपलोड केला जातो आणि त्याद्वारे चालू वेळेत मॅप सतत अपडेट केला जातो. 2024 पर्यंत ह्या सॅाफ्टवेअरमार्फत उत्तर अमेरिका,युरोप आणि आशिया मधील 500,000 कि.मी. पर्यंतचे रस्ते समाविष्ट करण्याचा कंपनीचा मानस आहे.


महत्त्वाच्या बातम्या: