Apple Watch Warning : स्मार्टवॉच हे आजच्या काळात लोकांसाठी एक महत्त्वाचे गॅझेट बनले आहे, त्यापैकी सर्वात आवडते घड्याळ म्हणजे Apple Watch. जे सुरक्षित देखील मानले जाते, परंतु आता याद्वारे सायबर हल्ल्याचा धोका समोर आला आहे. भारत सरकारने watchOS 8.7 च्या आधीच्या सर्व OS आवृत्त्यांवर चालणारे Apple Watch युजर्ससाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. जुन्या OS चे स्मार्टवॉच वापरणाऱ्यांना सायबर हल्ल्याचा धोका असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
युजर्सना सतर्कतेचा इशारा
भारत सरकार म्हणते की watchOS 8.7 पेक्षा जुन्या सर्व OS असलेल्या Apple Watch चे युजर्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अॅपल वॉचमध्ये आढळणाऱ्या असुरक्षिततेचा फायदा कोणताही सायबर गुन्हेगार घेऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, अॅपलने त्याच्या सपोर्ट पेजवर जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या घड्याळाबाबत पुष्टी केली आहे, त्यानंतर भारत सरकारने याबाबत एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.
CERT-in ची धोक्याबाबत सविस्तर माहिती
भारत सरकारच्या सूचनेनुसार, जुन्या व्हर्जनवर अॅपल वॉचच्या युजर्सनी नवीन आवृत्ती म्हणजेच watchOS 8.7 वर अपडेट केले पाहिजे. यासोबतच इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) ने या धोक्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 8.7 पेक्षा जुन्या सर्व OS ला धोक्याचे रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे सरकारला एक अॅडव्हायझरी जारी करावी लागली आहे.
हा धोका कसा टाळाल?
स्मार्टवॉचद्वारे कोणी सायबर गुन्हा कसा करू शकतो? तर सीईआरटी-इननुसार, सायबर गुन्हेगार लक्ष्यित अॅपल वॉचला स्पेशल रिक्वेस्ट पाठवेल. यानंतर तो ऍपल वॉचच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतो.
तुमचे OS अपडेट करा
अॅपलनेही आपल्या वॉचचा हा धोका स्वीकारला आहे. हा धोका टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमचे Apple Watch ताबडतोब OS 8.7 वर अपडेट करणे, कारण कंपनीने त्यात सर्व सुरक्षा फिचर्स आणली आहेत.
महत्वाच्या बातम्या :