Nokia T10 Launched: नोकियाने जागतिक स्तरावर आपला नवीन टॅबलेट Nokia T10 लाँच केला आहे. या टॅबलेटमध्ये 8-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. Nokia च्या Nokia T10 मध्ये 5100mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट आहे. हा टॅबलेट Android Enterprise Recommended असून हा Android 12 वर चालतो. यामध्ये तीन वर्षांसाठीचे मंथली सुरक्षा (Monthly Security) अपडेटही दिले जात आहेत. चला तर याच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


Nokia T10 चे स्पेसिफिकेशन (Specifications)



  • Nokia T10 हा कॉम्पॅक्ट टॅबलेट आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा टॅबलेट मजबूत डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे.

  • Nokia T10 ला IPX2 रेटिंग मिळाली आहे.

  • Nokia T10 मध्ये 8-इंचाचा एचडी डिस्प्ले आणि Unisoc T606 प्रोसेसर आहे.

  • Nokia T10 टॅबलेटचे स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते.

  • Nokia T10 च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, यात ऑटोफोकस आणि फ्लॅश सह 8MP प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी या टॅबलेटमध्ये 2MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.

  • Nokia T10 मध्ये फेस अनलॉक फीचरचाही सपोर्ट आहे.

  • Nokia T10 मध्ये 10W (5V/2A) चार्जिंग सपोर्ट असलेली 5100mAh बॅटरी आहे.

  • Nokia T10 टॅबलेटमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय (2.4 GHz आणि 5 GHz) आणि ब्लूटूथ v5.0 आहे.

  • कनेक्टिव्हिटीसाठी, Nokia T10 मध्ये 4G LTE, मायक्रो SD स्लॉट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट आहे.

  • Nokia T10 मध्ये एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि GPS, GLONASS आणि Galileo नेव्हिगेशन तंत्रज्ञानासह FM रेडिओ देखील आहे.


किंमत 


Nokia T10 टॅबलेट ओशन ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. हा टॅबलेट पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Nokia T10 च्या 3GB RAM सह 32GB स्टोरेज आणि वाय-फाय व्हेरिएंटची किंमत सुमारे 12,200 रुपये आहे. तर Wi-Fi Plus LTE व्हेरिएंटची किंमत सुमारे 14,000 रुपये आहे.