Netflix Microsoft Collaboration : नेटफ्लिक्स (Netflix) आता स्वस्त OTT स्ट्रिमिंग प्लॅन आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नेटफ्लिक्सने आता मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) हातमिळवणी केली आहे. नेटफ्लिक्स जाहिरातीसह (Ad-Support) असलेल्या सबस्क्रिप्शनसाठी (Subscription Plan) मायक्रोसॉफ्टसोबत भागीदार करणार आहे. नेटफ्लिक्स कंपनीनं सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्ट जागतिक तंत्रज्ञा आणि विक्रीमध्ये मदत करेल. नेटफ्लिक्सने एप्रिल महिन्यात अॅड सपोर्ट सबस्क्रिप्शन प्लॅनची घोषणा केली होती. 


नेटफ्लिक्स कंपनीनं आपली जुनी जाहिरात विना सबस्क्रिप्शन देण्याची योजना बदलण्याची घोषणा आधीच केली होती. आता बुधवारी नेटफ्लिक्सनं मायक्रोसॉफ्टसोबतच्या भागीदारीची घोषणा केली आहे. या नवीन भागीदारीमुळे नेटफ्लिक्स आता युजर्सला कमी किंमतीत सबस्क्रिप्शन प्लॅन देण्याची नेटफ्लिक्सची योजना आहे.


नेटफ्लिक्सने 15 वर्ष स्ट्रिमिंग कंटेंटमध्ये जाहिरात ने दाखवण्याचा आपली योजना आता बदलली आहे. मायक्रोसॉफ्टसोबत हातमिळवणी केल्यानंतर नेटफ्लिक्सकडून युजर्सना सर्वात सबस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न असेल. या सबस्क्रिप्शनमध्ये स्ट्रिमिंगवेळी जाहिरात दिसतील. 


नेटफ्लिक्स अलिकडच्या काळात फार तोट्यात आहे. मागील तीन महिन्यांमध्ये नेटफ्लिक्सकडे दोन लाखांहून अधिक युजर्संनी पाठ फिरवली आहे. त्यानंतर कंपनीकडून तोटा भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता कंपनी मायक्रोसॉफ्टची मदत घेणार आहे.


नेटफ्लिक्स कंपनीनं म्हटलं आहे की, 'मायक्रोसॉफ्ट कंपनीनं वेळेनुसार तंत्रज्ञानातील आवश्यक प्रगती करत बाजारात स्वत:चं स्थान कायम ठेवलं आहे. याचा कंपनीला फायदा होईल मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञान आणि सेल्स वाढवण्यात मदत करेल. कंपनीचं उद्दीष्ट ग्राहकांना चांगला अनुभव आणि जाहिरातदारांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणे आहे.'


 


महत्त्वाच्या इतर बातम्या