इंटरनेट बँकिंग, प्लास्टिक मनीचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली, तशी सायबर गुन्हेगारांची एटीएम धारकांकडे नजर वळली. पाच बँकांच्या 32 लाख एटीएमची माहिती चोरीला गेली. गेल्या वर्षी सायबर क्राईमच्या तब्बल 45 हजार घटना देशभरात घडल्या. नागरिक तब्बल 700 कोटींना बुडाले.
सायबर क्राईमवरचा उपाय तुमच्या हाताच्या तळव्यावर जन्मजात असलेलं रक्तवाहिन्यांचं जाळं. तुमचा हात हाच तुमचा पासवर्ड, पीन आणि सिग्नेचर बनू शकतो. हाताच्या रक्तवाहिन्यांचं जाळं आयुष्यभऱ बदलत नाही. पासवर्ड, पीनसारखा हात चोरुन नेता येत नाही. त्यांचाच वापर करुन आता नवी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
दीड लाख रुपये किंमतीच्या इन्फ्रारेड स्कॅनरवर कधीच चोरीला न जाणारी यंत्रणा शोधण्याचं काम गेली दीड वर्ष सुरु होतं. जपानमध्ये 2012 साली भूकंप आल्यावर मयतांच्या संपत्तीचे दावे निकाली काढताना गोंधळ झाला. त्यातून पाम व्हेन रिकग्निशन सिस्टिमची कल्पना पुढे आली. विद्यापीठ उपकेंद्रानं हाँगकाँग विद्यापीठाशी करार करून लातुरात अभ्यास सुरु केला.
हाँगकाँग विद्यापीठानं पुरवलेल्या 400 लोकांपैकी 100 जणांचे हात 8 वेगवेगळ्या अँगलनी स्कॅन करण्यात आले. या प्रकल्पात 99.99 टक्के अॅक्युरसी आहे. त्यामुळं पुढच्या काळात ही नवी टेक्नॉलॉजी चोरट्यांसमोरचं मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ :