स्मार्टफोनप्रेमींना खुशखबर! शाओमीचे तीन स्मार्टफोन लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2016 05:50 PM (IST)
मुंबई : चीनमधील प्रसिद्ध कंपनी शाओमीने बीजिंगमध्ये एका इव्हेंटमध्ये नवा स्मार्टफोन 'रेडमी 4' लॉन्च केला. याच इव्हेंटमध्ये शाओमी कंपनीने 'रेडमी 4A' आणि 'रेडमी 4 प्राईम' लॉन्च केला. किंमत :
रेडमी 4 - 699 युआन (सुमारे 6,900 रुपये)
रेडमी 4 प्राईम - 899 युआन (सुमारे 8,900 रुपये)
रेडमी 4A - 499 युआन (सुमारे 4,900 रुपये)
रेडमी 4 आणि रेडमी 4 प्राईम या दोन स्मार्टफोनच्या ऑर्डरही सुरु झाल्या आहेत. येत्या सोमवारपासून विक्री सुरु होणार असू, रेडमी 4A ची विक्री 11 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. रेडमी 4 आणि रेडमी 4 प्राईम या दोन्ही स्मार्टफोनला मेटल यूनिबॉडी (2.5D कव्हर्ड ग्लास) आहे. शिवाय, दोन्ही स्मार्टफोनमध्ये हायब्रिड ड्युअल सिम स्लॉटही आहे. रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी 4 चे फीचर्स -