Underworld Gang Wars Game : भारतात ऑनलाईन गेम्स (Online Games) खेळणाऱ्यांची संख्या कोट्यवधी आहे. त्यात मागील काही वर्षात आलेल्या बॅटल रॉयल गेम्सनी (Battle Royale Games) तर मोबाईल गेम खेळणाऱ्यांची संख्या आणि गेम खेळण्याचा वेळ कमालीचा वाढला आहे. तर बॅटल रॉयल गेम्सचं तुम्हाला कळेल असं उदाहरण म्हणजे पब्जी (PUBG). पब्जी आता भारतात बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India) अर्थात बीजीएमआय अशा नावाने ओळखला जातो. तर याच गेमच्या तोडीचा आणखी एक भारतात तयार झालेला गेम लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. मेहेम स्टुडिओजने (Mayhem Studios) त्यांच्या पहिल्या वहिल्या बॅटल रॉयल गेमची घोषणा केली असून अंडरवर्ल्ड गँग वॉर्स (Underworld Gang Wars) असं या गेमचं नाव असणार आहे. 


मंगळवारी या गेमची घोषणा कंपनीतर्फे करण्यात आली. विशेष म्हणजे हा गेम जितका खास आहे, तितकीच त्याची घोषणाही खासप्रकारे कंपनीतर्फे करण्यात आली. तब्बल 500 ड्रोन्स(Drone Show) मुंबईच्या आकाशात उडवत या गेमचं नाव सर्वांसमोर जाहीर करण्यात आलं. मेहेम स्टुडिओजने मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ड्रोन शोच्या माध्यमातून या गेमच्या नावाचं अनावरण केलं. तर यावेळी 500 ड्रोन्स महालक्ष्मी रेसकोर्समध्ये एकत्र उडाले, त्यानंतर आधी बंदूक मग बंदूक पकडलेल्या माणसाची आकृती असे विविध आकार ड्रोन्सनी घेतले, अखेर गेमचं नाव झळकल्यानंतर एक क्यूआर कोडही यावेळी तयार झाला. ज्याला उपस्थितांनी स्कॅन केलं असता थेट गेमचा युट्यूबवरील टीझर सर्वांना पाहायला मिळाला. 'अंडरवर्ल्ड गँग वॉर्स' हा गेम भारतातील दोन टोळींच्या शत्रुत्वाच्या अवतीभोवती फिरणार असून या गेमला विशिष्ट कथानक देखील असेणार असल्याचे कंपनीने सांगितले. लवकरच हा गेम सर्वांसाठी मोबाईलमध्ये उपलब्ध होणार असून 22 मे रोजी याचे प्रिरजीस्ट्रेशन होणार आहे.



महत्त्वाच्या इतर बातम्या