Escobar : आजच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आपले बऱ्यापैकी सर्व कामं आपल्या फोनवर अवलंबून असतात, त्यामुळे आपला सर्वात महत्त्वाचा डेटा फोनमध्ये सेव्ह होतो. या उपकरणांनी आपले जीवन सुकर केले असतानाच दुसरीकडे मात्र हीच उपकरणे घातक ठरत आहेत. जाणून घेऊया अशाच एका धोकादायक अँड्रॉइड मालवेअरबद्दल, जो तुमच्या बँक डिटेल्ससह तुमच्या फोनचा सर्व डेटा चोरू शकतो.
हा व्हायरस अशा प्रकारे कार्य करतो
एका रिपोर्टनुसार, हा व्हायरस पहिल्यांदा आढळला तेव्हा असे दिसून आले होते की, हा व्हायरस वेबसाइट्स, Google Play आणि Android डिव्हाइसवर थर्ड पार्टी अॅप्सद्वारे काम करत होता. नंतर असे दिसून आले की हॅकर्स व्हॉट्सअॅपसारख्या मेसेजिंग अॅपवर संदेश पाठवून लोकांनाही फसवत आहेत. बर्याच वेळा वापरकर्त्यांना अँटी-स्पॅम अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठविली गेली आहे जी प्रत्यक्षात स्पॅम आहे. मुळात या मालवेअरचे हे नवीन प्रकार कसे कार्य करत आहे आणि वापरकर्त्यांना अडकवण्याचे हॅकर्सचे माध्यम काय आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही. असे म्हटले जात आहे की हे बँकिंग ट्रोजन, बँकिंग अलर्टच्या नावाखाली युझर्सना ऑफर्स देत आहेत आणि अँटी व्हायरस प्लॅटफॉर्मला देखील टाळत आहे.
गुगल ऑथेंटिकेटर मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड चोरी करू शकतो
Eberbot Android ट्रोजन या नव्या व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. हा गुगल ऑथेंटिकेटर मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड चोरी करू शकतो. हा व्हायरस नवे फिचर्स व VNC चा वापर करून Android डिव्हाइस नियंत्रित करणे, ऑडिओ रेकॉर्ड करणे, फोटो घेणे, तसेच क्रेडेन्शियल चोरीसाठी काही विशिष्ट अॅप्सला टार्गेट करत आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, KELA च्या सायबर-इंटेलिजन्स DARKBEAST प्लॅटफॉर्मचा वापर करून, रशियन-भाषेच्या हॅकिंग फोरमवर एक पोस्ट सापडली, जिथे Aberebot विकसक त्याच्या 'एस्कोबार बॉट अँड्रॉइड बँकिंग ट्रोजन' नावाच्या नवीन आवृत्तीची जाहिरात करत आहे. मालवेयरहंटर, मॅकॅफी आणि सायबलच्या संशोधकांनी नंतर या निष्कर्षांची पुष्टी केली. बर्याच बँकिंग ट्रोजन्सप्रमाणे, एस्कोबार ऑनलाइन बँकिंग अॅप्स आणि वेबसाइट्ससह वापरकर्त्यांच्या परस्परसंवादांना हायजॅक करण्यासाठी ओव्हरले लॉगिन फॉर्म दाखवते. सायबर हॅकर्सना वापरकर्त्यांची बँक खाती ताब्यात घेण्यासाठी आणि अनधिकृत आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी देण्यासाठी माहिती चोरणे हे या व्हायरसचे मुख्य लक्ष्य आहे.
या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून त्यांच्या स्मार्टफोनमधील महत्वाची माहिती वाचवू शकता
Google Play Store व्यतिरिक्त कोठूनही APKs वरून अॅप्स इंस्टॉल करू नका.
तुमच्या फोनमध्ये Google Play Protect सुरू असल्याची खात्री करा.
कोणत्याही सोर्सकडून नवीन अॅप इंस्टॉल करताना, परवानगीच्यी विनंतीकडे खास लक्ष द्या.
कोणतीही संशयास्पद क्रिया आढळल्यास पहिल्या काही दिवस अॅपच्या बॅटरी आणि नेटवर्क वापराच्या आकडेवारीचे निरीक्षण करा.
इतर महत्वाच्या बातम्या