News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरेंशिवाय मोदींनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकरचंही कौतुक केलं. आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी आज सकाळीच, स्वत: झाडू हाती घेऊन मुंबईत स्वच्छता केली. मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केलं. आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी स्वत: ट्विट करुनही, स्वच्छतेचे संदेश दिले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या दोघांचं कौतुक केलं. मोदी म्हणाले, “माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन, मुंबईत साफसफाई केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो” https://twitter.com/narendramodi/status/912553793677430784 याशिवाय सचिनबद्दल मोदी म्हणाले, “सचिनने स्वच्छ भारत अभियानात घेतलेला सहभाग कायम असून, तो कौतुकास्पद आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे  देशभरातील लोक प्रेरणा घेतील. https://twitter.com/narendramodi/status/912553668850810881 तिसऱ्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात, “स्वच्छता ही सेवा या अभियानात अर्जुन तेंडुलकरसारख्या युवकांचा प्रतिसाद वाढतोय हे निश्चितच आनंददायी आहे. आपली युवाशक्ती स्वच्छ भारत नक्की बनवेल” https://twitter.com/narendramodi/status/912551653617700864 संबंधित बातम्या सचिनच्या हाती झाडू, अर्जुन तेंडुलकरसह वांद्रे परिसरात स्वच्छता अर्जुन तेंडुलकरची वांद्रे परिसरात साफसफाई
Published at : 26 Sep 2017 12:14 PM (IST) Tags: वांद्रे आदित्य ठाकरे अर्जुन तेंडुलकर सचिन तेंडुलकर मुंबई Aditya Thackeray Narendra Modi Mumbai arjun tendulkar Sachin Tendulkar

आणखी महत्वाच्या बातम्या

Mobile phone prices  Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ

यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या

यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय

Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय

टॉप न्यूज़

Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार

Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार

Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय

Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय

Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं

Pune Graduate And Teachers Election Result 2026:  पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात