मुंबई : अनेकदा आपण पासवर्ड विसरतो. मग तो जिमेलचा असो, किंवा एखाद्या अकाउंटचा. वायफायचा पासवर्डचा तर या यादीत आवर्जुन समावेश होतो. बऱ्याचदा व्हायफायचा पासवर्ड विसरल्यानंतर आपण राउटर बंद-चालू करतो. तसेच राऊटरही रिसेट करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण वायफाय रिसेट न करताही पासवर्ड मिळवू शकतो. कसं? अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील.
तुमचाही पासवर्ड हरवला असेल, तर पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला विंडोज आणि मॅक डिव्हाइसवर जाऊन राउटरचं सेटिंग पेज ओपन करावं लागेल. परंतु, या दोन्ही पद्धतींनी आपलं कामं व्हावं यासाठी तुमचा एक डिव्हाइस तुमच्या वायफाय नेटवर्कशी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
जर युजरचा डिव्हाइस वायफआय नेटवर्कशी कनेक्ट नसेल, तर अशावेळ ते WPS पूश बटनाचा वापर करु शकतात. हे बटन राऊटरच्या मागे असतं. किंवा मग तुम्ही इथरनेट केबलच्या मदतीनं राउटरच्या सेटिंग पेजवर जाऊ शकता.
वायफायचा पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा :
- सर्वात आधी वायफाय आपल्या विंडोज किंवा मॅक डिवाईजमध्ये कनेक्ट असलं पाहिजे.
- आपला लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधील सेटिंगमध्ये जाऊन विंडोज ऑपशनवर क्लिक करा.
- त्यांनंतर नेटवर्कवर जाऊन शेअरिंग ऑपशन ओपन करा.
- स्क्रिनवर येणाऱ्या चेंज एडॅप्टर सेटिंगवर क्लिक करा.
- त्यानंतर वायफायचा ऑप्शन समोर येईल त्यावर डबल क्लिक करा.
- Wifi स्टेटस पेज आल्यानंतर वायरलेस प्रॉपर्टिजवर क्लिक करा
- सिक्युरिटी टॅबवर क्लिक करुन शो पासवर्ड ओपन करा आणि आपला पासवर्ड पाहा.
जर आपला वायफाय कोणत्याही डिवाईजला कनेक्ट नसेल, तर...
- इथरनेट केबल घ्या आणि ती विंडोज डिवाइसशी कनेक्ट करा.
- RJ45 केबलला विंडोज पीसीशी कनेक्ट करा आणि राउटरच्या कंफीग्रेशन पेज ओपन करा. लॉग इन करा.
- एकदा लॉग इन केल्यानंतर राउटरवर वायफाय ऑप्शन क्लिक करा आणि पासवर्ड किंवा सिक्युरिटी ऑप्शनवर क्लिक करा.
- पासवर्ड पाहण्यासाठी शो पासवर्डवर क्लिक करा.
WPS बटन जर कोणत्या डिव्हाइसशी कनेक्ट असेल तर...
WPS बटन युजरसा कोणत्याही पासवर्डच्या मदतीनं वायफायशी कनेक्ट होण्याचा पर्याय देतो. त्यासाठी युजर्सना राउटरच्या मागे असलेल्या WPS बटनावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर युजर थेट सेटअप पेजवर जाऊन पासवर्ड सर्च करु शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :