Cheapest E-Scooter : भारतात इलेक्ट्रीक स्कूटरची बाजारपेठ वाढत आहे. अनेक नवीन कंपन्या नवीन फिचर्ससह ई-स्कूटर लाँच करत आहेत. आता त्यामध्ये बेंगळुरूची एक स्टार्ट-अप कंपनी जबरदस्त फिचर्ससह आपली ई-स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. Bounce Electric ही कंपनी लवकरच प्री-बुकिंग सुरू करणार आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफरही लाँच करणार आहे. त्यानुसार ही ई-स्कूटर बॅटरीशिवाय खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ही स्कूटर स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.
40 टक्क्यांपर्यंत किंमतीत घट
Bounce ने म्हटले की, त्यांच्या ई-स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा असणार आहे. बॅटरी संपल्यानंतर ती बॅटरी काढून दुसरी बॅटरी काढता येऊ शकते. जे ग्राहक ही ई-स्कूटर बॅटरीशिवाय खरेदी करणार आहेत. त्यांना कंपनीकडून भाडेतत्वावर बॅटरी मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांना बॅटरीची किंमत द्यावी लागणार नाही. या खास ऑफरमुळे स्कूटरची किंमत जवळपास 40 टक्क्यांनी कमी होणार आहे. या खास ऑफरमुळे ई-स्कूटरची किंमत 65 हजाराच्या आसपास असणार आहे.
हे आहेत खास फिचर्स
गोल ऑल-LED हेडलॅम्प, एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल देऊन ई-स्कूटरला चांगला लूक देण्याचा प्रयत्न केला. स्कूटरमध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही ठिकाणी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. कंपनीने स्कूटरमध्ये 2.1kWhची बॅटरी देण्याची शक्यता आहे. लवकरच कंपनीकडून या स्कूटरसाठी प्री-बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी 2022 पासून डिलीव्हरी सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने स्कूटरच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केले नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याची किंमत जाहीर होण्याची शक्यता आहे.
या ई-स्कूटर्ससोबत स्पर्धा
Bounce च्या ई-स्कूटरचा सामना TVS iQube, Ola S1, Ola S1 Pro, Bajaj, Hero, Pure Motors सोबत होईल. या सर्व ई-स्कूटरमध्ये चांगले फिचर्स असून त्यांची किंमत एक लाखापेक्षा कमी आहे. त्याशिवाय पुढील वर्षी Honda, Hero आणि सुझुकीदेखील आपल्या ई-स्कूटर बाजारपेठेत दाखल करण्याची शक्यता आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI