Airtel Mobile Tariff:  यंदाच्या वर्षात आता मोबाइल फोनवर बोलणं आणखी महागण्याची शक्यता आहे. फोन कॉल आणि इतर सेवांमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत एअरटेलच्या अधिकाऱ्याने दिले आहेत. सरासरी प्रति ग्राहक महसूल हा 200 रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नोव्हेंबर 2021 मध्ये एअरटेलने मोबाइल आणि सेवांच्या दरात 18 ते 25 टक्क्यांनी वाढ केली होती. 

भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोपाल विट्टल यांनी सांगितले की, “मला वाटतं की 2022 मध्ये मोबाइल सेवांचे दर वाढू शकतात. मात्र, येत्या तीन-चार महिन्यांत असे होणार नाही. मात्र, त्यानंतर दरवाढ होऊ शकते. पूर्वीप्रमाणेच या वेळीही आम्ही मोबाइल दरवाढीचा निर्णय घेण्यास पुढाकार घेऊ. 

Continues below advertisement


डिसेंबर तिमाहीत भारती एअरटेलचा एकत्रित निव्वळ नफा 2.8 टक्क्यांनी घसरून 830 कोटी रुपयांवर आला आहे. या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाले आहे. विट्टल यांनी सांगितले की, आमचा प्रति ग्राहक महसूल 2022 मध्ये 200 रुपयांवर पोहचण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय येत्या काही वर्षात हे प्रमाण 300 रुपये गाठेल अशी आशा आहे. 


डिसेंबर 2021 च्या तिमाहीत भारतातील Airtel चे 4G ग्राहक वार्षिक 18.1 टक्क्यांनी वाढून 195 दशलक्ष झाले. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ही संख्या 16.56 कोटी होती. भारतातील एअरटेलच्या नेटवर्कवरील प्रति ग्राहक डेटा वापर 16.37 गीगाबिट (GB) वरून 18.28 GB पर्यंत 11.7 टक्क्यांनी वाढला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha