Tecno 5G Smartphone: टेक्नो कंपनीचा पहिला 5 जी स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. टेक्नो पोवा 5 जी असं या स्मार्टफोनला नाव देण्यात आलंय. हा स्मार्टफोन एथर ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटी एफसीचा लोगो देण्यात आलाय. टेक्नो पोवा डायमेंशन 900 प्रोसेसर, अल्ट्रा-फास्ट LPDDR5, (8GB+3GB) व्हर्च्युअल रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात दाखल झालाय. या स्मार्टफोनची खासियत आणि किंमत जाणून घेऊयात. 


टेक्नो पोवा 5जी स्मार्टफोनची किंमत 
टेक्नो पोवा 5जी स्मार्टफोनची किंमत 19 हजार 999 इतकी आहे.  या स्मार्टफोनची खरेदी करणाऱ्या पहिल्या 1500 ग्राहकांना 1,999 रुपयांची मोफत पावर बँक दिली जाईल. टेक्नो पोवा 5जी स्मार्टफोनची पहिली विक्री 14 फेब्रुवारी 2022 पासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन वर सुरू होईल.


टक्नो पोवा 5जी स्मार्टफोनची खासियत
टेक्नो पोवा 5 जी स्मार्टफोनमध्ये 6.9 इंचचा डिस्प्ले देण्यात आलाय. यात मीडियाटेक डाइमेंसिटी 900 प्रोसेसर देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलाय. या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी मायक्रोएसडी कार्डनं वाढवली जाऊ शकतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारीत काम करतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिलाय. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. तर, एक एआय लेंस देण्यात आलंय. याशिवाय, 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. या स्मार्टफोनमध्ये 6 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आलीय, जी 18 व्हॉल्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha