पावसाळा सुरू झाला, की निसर्गाचा, धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी, सह्याद्रीच्या कुशीतील थरार अनुभवण्यासाठी अनेकांची पावले डोंगरांकडे वळतात. थरार अधिक थरारक करण्यासाठी अनेक संस्था वेगवेगळे प्रयोगही करत असतात. लॉकडाऊनमुळे मागील काही महिने हे शक्य नव्हते. परंतु मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व गोष्टी आता हळहळू सुरू होत आहे. असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता ते करताना काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी न घेतल्यास धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना साथीसंबंधी माहिती प्राप्त व्हावी तसेच विविध प्रकारच्या उपाययोजनांचे मार्गदर्शन व्हावे या हेतूने सुरू केलेले आरोग्य सेतू अ‍ॅप मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. हे अॅप वापरण्यासाठी आपले मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट देखील महत्त्वाचे आहे.


लॉकडाऊननंतर चार क्षण निवांत जगण्यासाठी, नवं काही अनुभवण्यासाठी बाहेर पडल्यानंतर तिथे गेल्यावर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आवश्यक आहे अशा गोष्टी हमखास विसरतो. पर्यटनाचा आनंद घेताना पूर्वतयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नियोजन चुकले तर पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या नियोजनासाठी "द ब्लूस्पून ट्रॅव्हलर" शुभम गांधी यांनी काही टिप्स दिल्या आहेत.


शुभम गांधी एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, ज्यांना अनेक लोक इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करतात. लहानपणापासून पर्यटनाची आवड असणारे शुभम गेल्या 8 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत आहे. कोरोनामुळे आता पर्यटनाचे स्वरुप बदलले आहे. पर्यटन करताना अधिकाधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवास करताना मोबाईल नेटवर्क चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त आरोग्य सेतू अॅपसाठी नाहीतर हॉटेल शोधण्यासाठी तसेच गूगल मॅपसाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. जर पर्यटनात तुम्हाला कोणती अडचण आली तर इंटरनेट हा तुमच्यासाठी मोठा आधार असल्याचे शुभम गांधी सांगतात.



शुभम गांधी म्हणाले, प्रवासादरम्यान इंटरनेट अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवासदरम्यान तुम्हाला आलेला अनुभव, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची तुमची इच्छा होते. अशावेळी जर तुम्ही योग्य टेलीकॉम ऑपरेटर निवडला नसेल तर तुमची ही इच्छा अपू्र्ण राहू शकते. त्याचबरोबर आसपासच्या पर्यटनस्थळांविषयी जाणून घेण्यासाठी देखील इंटरनेट आवश्यक आहे.


प्रवासाचे आपले वैयक्तिक अनुभव सांगताना गांधी म्हणाले, डोंगरदऱ्यात मोबाईल इंटरनेटच्या समस्या तुम्हाला येऊ शकतात. मला इंटरनेटची कधीच कोणती अडचण प्रवास करताना आली नाही, कारण मी 2008 सालापासून एअरटेल वापरत आहे. एकदा आम्ही पर्यटनासाठी डोंगराळ भागात गेलो होते. माझ्या सोबत असलेल्या इतरांना मोबाईल नेटवर्क वापरण्यासाठी डोंगरावरून 300 मीटर खाली यावे लागत असे. मी आणि माझा एक मित्र आम्ही एअरटेल वापरत असल्याने आम्हाला कधीचं कोणती अडचण आली नाही. ज्यांच्याकडे एअरटेलचे कनेक्शन नव्हते त्यांच्यासमोर फक्त दोनचं पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे त्यांनी एअरटेल वापरावे किंवा मोबाईल नेटवर्कशिवाय आपला प्रवास पूर्ण करावा.



सध्याची परिस्थिती पाहता पर्यटन करताना मोबाईल नेटवर्कच्याबाबतीत कोणतीही तडजोड करू नये. कारण याचा सरळ परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार आहे. पर्यटन करताना कोरोनाच्या काळात सोलो ट्रिप उत्तम असल्याचे शुभम गांधी सांगतात.