मुंबई : लोकप्रिय मोबाईल गेम PUBG भारतात बॅन केल्यानंतर पब्जी प्रेमींमध्ये निराशा पसरली होती. परंतु, पब्जी सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं केली होती. तेव्हापासूनच तरुण या गेमची आतुरतेनं वाट पाहत आहेत. परंतु, आता लवकरच प्रतिक्षा संपणार असून FAU-G गेम भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. पूर्णपणे भारतीय असलेला FAU-G गेम प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, 26 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. यामुळे तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. या गेमचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये पंजाबीमध्ये डॉयलॉग्स ऐकायला मिळतात.


लाखो लोकांनी केलं रजिस्ट्रेशन


दरम्यान, पब्जी बॅन झाल्यानंतर तरुणाईमध्ये प्रचंड निराशा पसरली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने देशात भारतीय गेम फौ-जी ची घोषणा करत लवकरच लॉन्च करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचसोबत गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनसाठीही सुरुवात झाली होती. ज्यामध्ये चाहत्यांचा खास उत्साह पाहायला मिळाला होता. सुरुवातीला 24 तासांमध्ये लाखो लोकांनी गेमसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं.


अक्षय कुमारने शेअर केलं एंथम

अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाउंटवर या गेमचा एंथम जारी केलं आहे. त्याचसोबत त्याने गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनची लिंकही फॅन्ससोबत शेअर केली आहे. या लिंकमार्फत यूजर्स गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करु शकतात.


कमाईतील काही वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान करणार


अक्षय कुमारे काही दिवसांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स - फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे."


पाहा फौ-जी गेमचा टीझर :





असा करा गेम डाऊनलोड




  • फौ-जी गेम लॉन्च झाल्यानंतर युजर्ससाठी हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल.

  • त्याचसोबत हा गेम ऑफिशिअल साईटवरुनही डाऊनलोड करता येईल.

  • सध्या फौ-जी गेमची ऑफिशिअल वेबसाइट लॉन्च झालेली नाही. तसेच गेमबाबत सर्व माहिती गेमचे प्रमोटर्स nCore गेम्स मार्फत देण्यात येत आहे.


कसं कराल फौ-जी गेमचं प्री-रजिस्ट्रेशन?


गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली आहे. प्रमोटर्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मिलियनहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे. प्री-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया गूगल प्ले-स्टोअरवर करण्यात येत आहे.


FAU-G गेम 26 जानेवारी रोजी डाऊनलोड करण्यात येणार आहे. अॅन्ड्रॉईड युजर्स हा गेम प्ले स्टोअरवरुन सहज डाऊनलोड करु शकणार आहेत. तसेच अॅपल युजर्ससाठी हा गेम कधी उपलब्ध होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फौ-जी गेममधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या गेममध्ये एक भाग भारत-चीन लगतच्या गलवान खोऱ्याचा आहे. युजर्स भारताच्या सीमांवर तैनात होऊन शत्रुला सडेतोड उत्तर देऊ शकणार आहेत.


PUBG वर बंदी घातल्यानंतर FAU-G ची घोषणा


गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर केंद्र सरकारने 29 जून रोजी 59 चिनी अॅप्स, 27 जुलै रोजी 47 अॅक्स आणि 2 सप्टेंबरला 118 अॅप्स बॅन केले होते. यामध्ये पब्जी, टिकटॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. या अॅपवर बंदी असली तरी मोबाईल आणि डेस्कटॉप व्हर्जन अजूनही उपलब्ध आहेत. केंद्राच्या या निर्णयानंतर अक्षय कुमारने FAU-G या गेमची घोषणा केली होती. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी FAU-G या गेमबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या


दरम्यान, अक्षय कुमार या गेमचा ब्रँड अॅम्बॅसिडर असणार आहे. भारत-चीन सीमावादानंतर पॉप्युलर गेम PUBG भारतात बॅन करण्यात आला होता. FAU-G आता PUB-G ची जागा घेणार का? हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :