मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपा वापर आता व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र यंदा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी व्हॉट्सअॅप व्हॉईस आणि व्हि़डीओ कॉलिंगचा वापर विक्रमी ठरला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला व्हॉट्सअ‍ॅपवरुन 1.4 अब्ज व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल केले गेले आहेत. कोणत्याही एका दिवसात जगभरात व्हॉट्सअॅपवर हे सर्वाधिक कॉलिंग आहे.


50 टक्के अधिक कॉलिंग


अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपवर यावर्षी न्यू इयरच्या पूर्वसंध्येला 2019 च्या तुलनेत 50 टक्के अधिक कॉल करण्यात आले आहेत. वर्ष 2020 मध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे लोकांच्या व्हॉट्सअॅप कॉलिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हेच कारण आहे की कंपनीने देखील ग्रुप कॉलिंगची मर्यादा 4 वापरकर्त्यांवरून 8 वापरकर्त्यांपर्यंत वाढवली.


यावर्षी व्हॉट्सअॅप युजर्सनी  मेसेजपेक्षा कॉल करण्यावर जास्त भर दिला. वर्ष 2019 च्या शेवटच्या दिवशी जगभरातील व्हॉट्सअॅप युजर्सनी एकमेकांना 20 अब्ज मेसेज पाठवले होते. 2019 च्या शेवटच्या दिवशी पाठविलेल्या 20 अब्ज मसेजपैकी 12 अब्ज संदेश फक्त भारतात पाठविण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत आणि येथे व्हॉट्सअ‍ॅपच्या युजरबेसमध्ये 400 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत.


लाईव्ह व्हिडिओचा वापर


वर्ष 2020 मध्ये केवळ व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलच नाही तर लाईव्ह ब्रॉडकास्ट फीचरही मोठ्या प्रमाणात वापरले गेले. यावर्षी नवीन वर्षाच्या संध्याकाळी 5.5 दशलक्ष लाईव्ह व्हिडीओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केले गेले. अमेरिकेतील मेसेंजर अॅपवर सर्वाधिक ग्रुप व्हिडिओ कॉल केले गेले. तर 2020 मध्ये Fireworks सर्वात जास्त वापरला गेलेला AR Effect होता.


संबंधित बातम्या


महत्वाच्या बातम्या: