FB Tips For Users : लहानापासून वयस्करांपर्यंत आज प्रत्येकाचा हातात मोबाईल दिसतोच. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे मोबाईल दिसतोच. शाळेतील शिक्षणापासून बँकेच्या कामासाठी प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर होतोच. या मोबाईलमध्येच प्रत्येक दुसरा व्यक्ती सोशल मीडियावर असतो.  वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी आपला आयडी तयार केलाय. मनोरंजनासाठी प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करत असतो. सर्व सोशल मीडियाचा विचार केल्यास फेसबुकवर सर्वात जास्त जण जोडले गेले आहेत.  पण अनेक जणांची फेसबुक खाती ब्लॉक झाली आहेत. फेसबुक (facebook ) खातं ब्लॉक का होतं?(reasons why facebook block accounts)यामागची कारणं काय आहेत.. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? त्याबद्दल जाणून घेऊयात... (Utility News In Marathi)


(utility news) पाहूयात कोणत्या चार कारणांमुळे फेसबुक खातं ब्लॉक होऊ शकतं.. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.. 


फेसबुकचं (facebook ) खातं ब्लॉक होण्याचं एक कारण फेक अकाऊंट असू शकते. कारण, फेसबूककडून प्रत्येक खात्यावर नजर ठेवली जाते. जर तुम्ही फेक खातं वापरत असाल तर ते तात्काळ ब्लॉक केलं जातं.  


जर तुम्ही फेसबुक (facebook ) खात्यावरुन धार्मिक भावना दुखावल्या जाणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ शेअर करत असाल. त्यामुळे दंगली अथवा दोन समाजात तेढ निर्माण होत असेल. याबद्दल कुणी तक्रार केली असेल तर तुमचं खातं तात्काळ ब्लॉक केलं जातं. कधी कधी फेसबुक (facebook ) स्वत: असे खाते ब्लॉक करतं. 
 
जर तुम्ही मर्यादापेक्षा जास्त फोटो, व्हिडीओ अथवा एखाद्या पेजची लिंक याला अन्य ग्रुपवर पोस्ट करत असाल.. तर अशा परिस्थितीत फेसबुक तुमचं खातं ब्लॉक करु शकते. त्यामुळे एखाद्या ग्रुपवर पोस्ट करताना मर्यादा विसरु नका.. तसेच कुणाच्याही भावना दुखतील असा पोस्ट करु नका.. 


अनेकदा असं होतं की फेसबुकचा पासवर्ड विसरला जातो. त्यावेली पासवर्ड लक्षात नसल्यानं वारंवार चुकीचा पासवर्ड टाकला जातो. त्यावेळी तुमचं फेसबुक (facebook ) खातं ब्लॉक होतं.  त्यामुळे चुकीचा पासवर्ड टाकू नका... पासवर्ड विसरलात तर forgot password या पर्यायाचा वापर करा.. सर्व प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर तुमचं फेसबुक खातं पुन्हा सुरु होईल.   (Utility News In Marathi)


आणखी वाचा :


Instagram खाते हॅक झाल्यावर असं करा रिपोर्ट, जाणून घ्या रिकवर करण्याच्या टिप्स 


 डिजिटल युगात का मागितला जातो CANCELLED CHEQUE? जाणून घ्या सविस्तर माहिती