Instagram Account Recovery : आज प्रत्येकजण  इन्स्टाग्राम वापरतोच... लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्ममध्ये इन्स्टाग्रामचं नाव आघाडीवर आहे. इन्स्टाग्रामच्या वापरामुळे अनेकजण रात्रीत प्रसिद्धीझोतात आले. फोटो आणि रिल्समुळे अनेकांना प्रसिद्धी मिळाली.  अशातच सोशल मीडिया खाते हॅक झाल्याच्या अनेक घटनाही समोर येत आहेत. यात इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याचेही अनेकदा समोर येतं. इन्स्टाग्राम युजर्स अनेक वर्षांपासून हॅकिंगचा सामना करत आहेत. इन्स्टाग्राम आपल्या यूजर्सला हॅक झालेल्या खातं पुन्हा सुरु (रिकवर) करण्याची सुविधा देतेय. सोप्या टेप्स फॉलो केल्यानंतर हॅक झालेलं इन्स्टाग्राम खातं पुन्हा सुरु होऊ शकतं. जर तुम्हीही हॅकिंगचा शिकार झाला असाल तर घाबरु नका.. सोप्या टेप्स फॉलो करा आणि इन्स्टाग्राम खातं पुन्हा सुरु करा...  (Utility News In Marathi)


Instagram खात्यासाठी असा करा रिपोर्ट -  


जर तुमचं खातं आणखी कुणी वापरत असेल अथवा हॅक झालं असे तुम्हाला वाटत असेल तर तात्काळ इन्स्टाग्रामचा पासवर्ड बदला.  


इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्यानंतर तुम्हाला अॅक्सेस करता येत नाही, कारण हॅकर्स तात्काळ पासवर्ड बदलतो. असं झाल्यास तुम्ही एका पद्धतीनं रिपोर्ट करु शकता... त्यासाठी खालील सोप्या टेप्स फॉलो कराव्या लागतील..  


मित्राला अथवा परिवारातील कोणालाही इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलवर जाण्यास सांगा.. 


त्यानंतर उजव्या बाजूला हॅमबर्ग आयकॉन दिसेल... त्यावर क्लिक करा.. 
त्यानंतर रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा...  
Report Account ऑप्शन निवडा... 
तुम्हाला अनेक पर्याय दिसतील... त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल. 
इन्स्टाग्राम खात्याचा रिपोर्ट करण्यासाठी तुम्हाला एक कारण द्यावं लागेल... 
तुम्ही It’s pretending to be someone else हा पर्यायही निवडू शकता.. 
त्यानंतर तुम्हाला Someone I Know च्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. 
 
रिपोर्ट मिळाल्यानंतर इन्स्टाग्राम प्रोपाईलची तपासणी करेल.. त्यानंतर तुमच्याशी संपर्क करेल...


खात्याचं अॅक्सेस मिळण्यासाठी अशी पाठवा रिक्वेस्ट -  
हॅकर्स इन्स्टाग्रा खातं हॅक केल्यानंतर तुमच्या सर्व डिवायसमधून लॉगआऊट करु शकतं.  तसेच पासवर्डही बदलू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही ई-मेलच्या मदतीनं इन्स्टाग्रामवर लॉग इन साठी रिक्वेस्ट पाठवू शकता...  
 
Instagram ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन असे स्क्रीनवर दिसेल. 
पासवर्ड बदलल्यानंतर Get help logging in असा पर्याय निवडा...  
वरील पर्याय निवडल्यानंतर इन्स्टाग्राम तुमच्या इनबॉक्समध्ये एक विशेष लिंक पाठवेल... 
लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती फॉलो करा.. 


सिक्योरिटी कोडद्वारेही करु शकता लॉगइन -
वरती दिलेल्या कोणताही पर्याय काम करत नसेल तर सिक्योरिटी कोडद्वारे रिक्वेस्ट करु शकता.. 
इन्स्टाग्राम ओपन करा.. त्यानंतर लॉगइन स्क्रीन आल्यानंतर Get Help Logging In हा पर्याय सिलेक्ट करा.
त्यानंतर तुमचा यूजरनेम, ईमेल अॅड्रेस आणि फोन क्रमांक टाका...
 त्यानंतर Need more help? हा पर्याय निवडा आणि स्क्रीनवरील दाखवण्यात आलेले टिप्स फॉलो करा. त्यानंतर Send security code वर क्लिक करा..  
त्यानंतर तुमचा ईमेल इनबॉक्स पाहा... त्यावर एक कोड येईल.. तो कोड इन्स्टाग्राम अॅपवर टाका... 
 आता इन्स्टाग्राम खातं रिकवर करण्यासाठी तुमची आयडेंटिटी व्हेरिफाय करा....