मुंबई : तुम्हाला जर तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर यावर दैनंदिन काम करायचे आहे तर याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. ही साधने योग्यरित्या वापरली न गेल्यास काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागेल. बर्‍याचदा संगणकामध्ये बराच ( Junk Files) उपयुक्त नसलेला डेटा साठवला जातो. ज्यामुळे पीसी असू देत किंवा लॅपटॉप, स्मार्टफोन असू दे, तो हँग तर होतोच सोबतच तो स्लो होतो. बरेचदा आपण याकडे  लक्ष देत नाही, आणि या साधनांमध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते. पण असे न करता अगदी पटकन आणि अगदी सोप्या पद्धतीने या जंक फाइल्स कशा डिलीट करायच्या ते पाहूया.


Window PC मधून अशा पद्धतीने डिलीट करा Junk  Files 


1 . सर्वप्रथम Start Menu वर जा. 
2 .  तिथे cmd टाइप करताच तुम्हाला Cammand Prompt window चा पर्याय समोर दिसेल. तो पर्याय उघडा.
3 . त्यानंतर तात्पुरत्या फाइल्स तपासण्यासाठी, Cammand Prompt window जाऊन  %SystemRoot%explorer.exe %temp% हा कोड तिथे प्रविष्ट करा.
4 . आता सर्व प्रकारच्या जंक फाइल्स तुमच्या समोरील स्क्रीन वर येतील. नंतर ctrl+A दाबून त्या सर्व फाइल्स सिलेक्ट करा.
5 . हे केल्यानंतर त्या सर्व फाइल्स डिलीट करून टाका. 
6 . याऐवजी जर तुम्हाला कोणत्याही इतर मार्गाने जंक फाइल्स डिलीट करायच्या असल्यास cleanmgr/verylowdisk/e ही कमांड तुम्हाला वापरता येईल. 


फिशिंग  (डेटा चोरण्याचा प्रयत्न ) टाळण्यासाठी  ही पद्धत वापरा
कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती जसे की, बँक खाते क्रमांक, लॉगिन आयडी, पासवर्ड, ओटीपी, युनिक रजिस्ट्रेशन नंबर, कार्ड पिन, atm च्या मागील सीव्हीव्ही आणि आधार कार्ड नंबर कोणालाही सहजरित्या देऊ नये. याबाबतीत सावधानी बाळगणे फार गरजेचे आहे. शक्यतो शहानिशा केल्याशिवाय कोणालाही आपले पर्सनल डिटेल देऊ नयेत. अशा प्रकारचा कोणताही कॉल आल्यास बँकेशी लगेचच संपर्क साधावा. असा काही घोळ झाल्यास आधी आपल्या बँक खात्यातील रक्कम तपासा. जर तुम्हाला त्यात काही रकमेची गोंधळ लक्षात आली तर तर त्वरित बँकेला कळवा.


महत्वाच्या बातम्या :