koo App update : मायक्रो ब्लॉगिंग आणि बहुभाषिक वापरासाठी सोयीचे अशी Koo Appची ओळख आहे.  आता या अॅपने पहिल्यांदाच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर भारतीय भाषांसाठी केंद्रीय संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. सर्वच भाषांमध्ये कंटेन्ट मॉडरेशनला मजबूत करण्यासाठी हा करार केला जाणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सामान्य वापरासाठी सोशल मिडीया यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढतेय. आज भारतात जवळपास, 45 कोटी सोशल मिडीया वापरकर्त्यांची संख्या आहे. यामध्ये डिजीटल मिडीया वापरणाऱ्यांची संख्या तर जास्त आहेच पण, पहिल्यांदाच सोशल मिडीयाचा वापर करणारे यूजर्सचा देखील यामध्ये समावेश आहे. 


भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग सोशल मिडीयावर आपलं मत मांडताना दिसतो.  त्यासाठी या यूजर्सना मार्गदर्शनाची गरज आहे. त्याचबरोबर, सोशल मिडीयाच्या वापरकर्त्यांसाठी कंटेन्ट बनविण्यासाठी सुरक्षित ठिकाण बनविण्याची गरज आहे. यामुळेच भारताच्या बहुभाषी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म koo App च्या होल्डींग कंपनीने Bombinate Technologies Pvt Ltd सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लॅग्वेजसह एक सामंजस्य करार केला आहे. हा एक पारदर्शी करार आहे. तसेच भारतीय भाषांमधील ऑनलाइन गैरवर्तन, गुंडगिरी आणि अश्लील शब्दांचा वापर मर्यादित करण्याबरोबरच एक अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी उपयुक्त असा हा करार आहे.


भारत सरकारद्वारे स्थापित करण्यात आलेल्या, Koo अॅपच्या कंटेन्ट मॉडरेशनच्या धोरणांना बळकट करण्यासाठी तसेच, वापरकर्त्यांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी संयुक्तपणे हा करार कार्य करणारा आहे.  ही संस्था 22 अधिकृत भारतीय भाषांमध्ये आक्षेपार्ह किंवा संवेदनशील समजल्या जाणार्‍या शब्दांचा संग्रह तयार करेल. या बदल्यात, Koo अॅप हा निधी तयार करण्यासाठी आवश्यक डेटा पुरवेल. ऑनलाइन व्यवहाराला चालना देण्यासाठी हे दीर्घकालीन सहकार्य आहे. तसेच, भारतीय सोशल मीडिया इकोसिस्टममध्ये हे पहिलेच पाऊल आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha