Realme 9i Launched in India : कमी किंमतीत जास्त फीचर्स देणारा मोबाईल म्हणून रिअलमीची ओळख आहे. आता याच रिअलमी ने भारतात Realme 9i नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाची की फुल HD+ IPS LCD स्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या स्मार्टफोनचा सेल 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट, रिअलमी ऑनलाईन स्टोर आणि देशभरातल्या सर्व ऑनलाईन रिटेल स्टोरवर हा मोबाईल उपलब्ध आहे. 


Realme 9i 6.6 इंचाच्या फूल HD+ IPS LCD डिस्प्लेसह येतो. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. तसेच, एन्ड्रॉईड 11 औपरेटिंग सिस्टीमवर आधारित रिअलमी यूआय 2.0 वर चालणारा आहे. या मोबाईलची डिव्हाईस 6GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह आहे. या मोबाईलमध्ये 11GB पर्यंत व्हर्च्यअल रॅम सपोर्टसह हा मोबाईल उपलब्ध आहे. इंटर्नल स्टोरेजला मायक्रोएसडीच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवण्याचा पर्याय आहे. 


कसा असेल मोबाईलचा कॅमेरा ?


कॅमेऱ्याच्या बाबतीत या मोबाईलमध्ये हॅन्डसेटमध्ये ट्रिपल रियरचा कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये f/1.8 अपर्चरचा 50MP प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरचा 2MP मायक्रो कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरची 2MP मोनोक्रोम लेन्स दिली आहे. 


सेल्फीसाठी या मोबाईलच्या फ्रंटला 16MP कॅमेरा दिला आहे. Realme 9i मध्ये  5000mAh ची बॅटरी दिली आहे. 33 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा हा मोबाईल आहे. या मोबाईलच्या डिव्हाईसचे वजन 190 ग्रॅम आहे. याचे डायमेन्शन 164x75.7x8.4 मिमी आहे. 


जाणून घ्या या मोबाईलची किंमत :


Realme 9i हा एक बजेट फ्री कॅटेगरीतला मोबाईल आहे. 13,999 रूपयांपासून या मोबाईलची सुरूवात होते. या मोबाईलची बेस मॉडेल 64GB इंटर्नल मेमरीसह सुरू होऊन यामध्ये 4GB रॅम दिली आहे. तर या मोबाईलचा दुसरा मॉडेल 6GB रॅमचा आहे. यामध्ये 128GB इंटर्नल मेमरी दिली आहे. वेगवेगळ्या फीचर्ससह हा मोबाईल फक्त 15,999 रूपयांना बाजारात उपलब्ध आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha