Jio : जिओ (Jio) प्लॅटफॉर्म या डिजिटल सेवा कंपनीने भारतातील उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा बाजारात प्रवेश केला आहे आणि हा प्रवेश केल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रॉडब्रँड (Broadband) सेवेचा 100 Gbps इंटरनेट स्पीड मिळणं शक्य होणार आहे. 


निर्णय काय?


जिओने लक्झेंबर्ग स्थित कंपनी SES सह संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी जिओ स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. या संयुक्त उपक्रमात जिओ प्लॅटफॉर्मकडे 51 टक्के आणि SES 49 टक्के भागीदारी आहेत.


कंपनी स्टेटमेंट


कंपनीने निवेदन जारी करत, हा संयुक्त उपक्रम भारतात SES च्या उपग्रह डेटा आणि कनेक्टिव्हिटी सेवा प्रदान करण्याचे एक साधन असेल असं म्हटलं आहे. दरम्यान, SES काही आंतरराष्ट्रीय वैमानिक आणि सागरी ग्राहकांना थेट म्हणून सेवा प्रदान करणार आहे.


SES द्वारे 100 Gbps क्षमता प्रदान केली जाईल असं निवेदनात असे म्हटले आहे. या संयुक्त उपक्रमामुळे भारतीय बाजारपेठेने जिओची मजबूत स्थिती आणि विक्री नेटवर्कद्वारे संधी फायदा उचलावा असं जिओचे संचालक आकाश अंबानी म्हटलं आहे. आम्ही आमच्या फायबर-आधारित कनेक्टिव्हिटी विस्तार करत राहू आणि SES सह संयुक्त उपक्रम मल्टी गिगाबिट ब्रॉडबँडमध्ये वाढ करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha