Infinix Zero 5g Features : स्मार्टफोन बनविणारी कंपनी Infinix ने भारतात आपला नवीन आणि पहिला 5G स्मार्टफोन ZERO लाँच केला आहे. या मोबाईलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधला उत्कृष्ट रॅम. या मोबाईलमध्ये 8GB RAM आहे. याशिवाय यामध्ये 5 जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे. म्हणजे या मोबाईलमध्ये एकूण 13 GB पर्यंतची रॅम देण्यात आली आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 900 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा आणि डिस्प्ले
या मोबाईलमध्ये 128GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. ज्याला मेमरी कार्डने 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. Infinix Zero 5G मध्ये 6.78 इंच फुल HD LTPS डिस्प्ले आहे. या मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे. 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यामध्ये 2X ऑप्टिकल झूम आणि 30X डिजिटल झूम आहे.
बॅटरी आणि पॉवर
हा मोबाईल Google च्या Android 11 वर काम करेल. हा 5G फोन आहे आणि ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह येतो. या मोबाईलला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याबरोबर 33 वॅटचा चार्जर देण्यात आला आहे.
किंमत आणि ऑफर्स
या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये आहे. हा मोबाईल फ्लिपकार्टवर 5000 रुपयांच्या सूटसह उपलब्ध आहे. सिटी बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 750 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, 1667 रुपये प्रति महिना हप्त्यावर क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्याची ऑफर आहे.
17 फेब्रुवारीला लॉंच होणार्या Oneplus Nord CE 2, Samsung Galaxy M32 5G, Samsung Galaxy M52 5G, Samsung Galaxy A22 5G, Vivo Y33T, Vivo V21e 5G या बरोबर अनेक स्मार्टफोनशी हो मोबाईल टक्कर देणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- WhatsApp Cover Photo : आता फेसबुकसारखा कव्हर फोटो WhatsApp profile वरही ठेवता येणार, लवकरच येणार नवं फीचर
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha