Reliance Jio ही सध्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना अनेक प्रकारचे प्लान ऑफर करते. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लान ऑफर करते. अशातच वापरकर्त्यांकडे अनेक रिचार्ज प्लानचा पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनेक OTT अॅप्सचे फायदे मिळतील. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime Video, Disney + Hotstar, Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एवढेच नाही तर या प्लानमध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदेही मिळणार आहे. चला तर रिलायन्स जिओच्या या पोस्टपेड प्लानबद्दल जाणून घेऊया.


रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा प्लॅन


Reliance Jio चा Rs 399 पोस्टपेड प्लॅन अनेक OTT अॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह येतो. याशिवाय यूजर्सना या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देखील देण्यात आली आहे. या पोस्टपेड प्लस प्लानसह, तुम्हाला एसएमएस फायदे देखील दिले जातात.


रिलायन्स जिओचा हा पोस्टपेड प्लस प्लान 75GB हाय स्पीड डेटासह येतो. त्यानंतर 10/GB शुल्क आकारले जाईल. यामध्ये 200GB डेटा रोलओव्हर देण्यात आला आहे. या प्लानमध्ये कंपनी इंटरनॅशनल रोमिंगचा पर्यायही देते. यासोबत तुम्हाला अनेक जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. 


जिओच्या या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या OTT फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Netflix चे सबस्क्रिप्शन मिळेल. जर तुम्ही स्वतःसाठी असाच OTT प्लान शोधत असाल, तर हा एक उत्तम प्लान ठरू शकतो.


महत्वाच्या बातम्या :