Jio Phone 5G : आजकाल देशातील प्रत्येक व्यक्ती वेगवान कनेक्टिव्हिटीसह 5G सुविधा मिळण्याची वाट पाहत आहे. यासाठी देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्या 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. जिओ असो, VI किंवा एअरटेल, तिघांनीही त्यांच्या 5G सेवेची चाचणी पूर्ण केली आहे. तिन्ही टेलिकॉम कंपन्यांना आता शक्य तितक्या लवकर 5G लॉन्च करायचे आहे. अशातच 5G शी संबंधित ताजी आणि मोठी बातमी समोर येत. Jio लवकरच आपला Jio Phone 5G लॉन्च करू शकतो. याच दरम्यान जिओ 15 ऑगस्ट रोजी त्यांची 5G सेवा सुरू करू शकतो, अशी चर्चा आहे.


Jio Phone 5G ची किंमत


Jio Phone 5G बद्दल बोलले जात आहे की, हा फोन या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केला जाऊ शकतो. Jio Phone 5G ची किंमत अंदाजे 12,000 रुपये असेल. मात्र दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये Jio Phone 5G ची किंमत फक्त 2,500 रुपये असेल, असा दावा करण्यात आला आहे. अहवालातील दावा खरा ठरला तर हा देशातील सर्वात स्वस्त 5G फोन बनू शकतो. असा अंदाज वर्तवला जात आहे की Jio Phone 5G हा फीचर फोन असू शकतो. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, फोन महाग असू शकतो, 2,500 रुपये डाउन पेमेंट आणि बाकीचे पैसे ईएमआयमध्ये भरण्याची सुविधा असेल.


Jio Phone 5G चे संभावित स्पेसिफिकेशन 



  • Jio Phone 5G च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 13 मेगापिक्सलची असू शकते. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो असू शकते. त्याचप्रमाणे समोर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

  • Jio Phone 5G मध्ये OS दिला जाऊ अशकतो. जो आधीपासून Jio Phone Next मध्ये आहे.

  • Jio Phone 5G मध्ये 6.5-इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो. ज्याचे रिझोल्यूशन 1600x720 पिक्सेल असू शकते.

  • Jio Phone 5G सह, स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर आणि 32 GB स्टोरेज 4 GB RAM सह देखील उपलब्ध असू शकते.


महत्वाच्या बातम्या :