Moto Razr 2022 Launch : Motorola ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Razr ची तिसरी जनरेशन Moto Razr 2022 लॉन्च केला आहे. लॉन्च होताच या स्मार्टफोनचे 10 हजार युनिट्स विकले गेले आहेत. जरी हा स्मार्टफोन नुकताच देशांतर्गत बाजारात लॉन्च झाला आहे. कंपनीने दावा केला आहे की, स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले, कॅमेरा आणि प्रोसेसर आधीच्या फोल्डेबल स्मार्टफोनपेक्षा चांगले दिले गेले आहेत. फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आढळला आहे. यासोबत, 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनमध्ये HDR10+ सपोर्ट करण्यात आला आहे. तसेच, Moto Razr 2022 मध्ये 32 MP चा फ्रंट कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 


Moto Razr 2022 चे डिटेल्स : 



  • Moto Razr 2022 मध्ये Android 12 आधारित MyUI 4.0 देण्यात आला आहे.

  • Moto Razr 2022 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फोल्डेबल AMOLED डिस्प्ले आहे, जो 144Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो.

  • Moto Razr 2022 स्मार्टफोनमध्ये 2.7-इंचाचा OLED कव्हर डिस्प्ले देखील उपलब्ध आहे.

  • या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 12 GB पर्यंत RAM सह 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. 

  • Moto Razr 2022 मध्ये 3,500mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

  • Moto Razr 2022 स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, यात डॉल्बी एटमॉस स्पीकर, 5G (19 5G बँड सपोर्ट) आणि वाय-फाय 6E सारखे फीचर्स दिले गेले आहेत. 


Moto Razr 2022 चा कॅमेरा : 


Moto Razr 2022 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, जो 50 mp प्रायमरी लेन्ससह येतो. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) साठी देखील समर्थन आहे. 13 एमपी अल्ट्रा वाईड सेन्सरसह, हे मॅक्रो फोटो क्लिक करण्यास देखील सक्षम आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32 एमपी कॅमेरा आहे. 


Moto Razr 2022 ची किंमत : 


मोटोने हा स्मार्टफोन सिंगल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोनच्या 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 युआन (रु. 70,750) आणि 12 GB RAM + 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,299 युआन (सुमारे 86,000 रुपये) आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात प्री-बुकिंगसाठी Moto Razr 2022 देखील उपलब्ध करून दिला आहे. ज्यावर कंपनीने दावा केला आहे की, केवळ पाच मिनिटांत 10 हजार लोकांनी स्मार्टफोन विकत घेतला आहे.


महत्वाच्या बातम्या :