iPhone SE3 : जर तुम्ही आयफोनचे (iPhone) चाहते असाल आणि त्याच्या नवीन मॉडेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीचा आयफोन एसई 3 (iPhone SE3) मॉडेल 8 मार्चला लाँच होऊ शकतो. लोक खूप दिवसांपासून या फोनची वाट पाहत आहेत. लाँच होण्यापूर्वीच याचे फीचर्स लीक झाले आहेत. यात तुम्हाला काय विशेष फिचर्स मिळू शकतात ते जाणून घ्या.
डिझाइन iPhone SE सारखे
मिळालेल्या रिपोर्टनुसार, iPhone SE 3 ला mmWave आणि sub-6Hz 5G सपोर्टसह त्याच्या ब्रँडच्या टॉप-ऑफ-द-लाइन A15 बायोनिक चिपसेटसह लाँच करू शकते. या नवीन मॉडेलचे डिझाइन iPhone SE (2020) सारखे असण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नवीन आयफोन 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांसह बाजारात येईल.
iPhone SE3 चा कॅमेरा
iPhone SE 3 मध्ये रियर कॅमेरा 12 मेगापिक्सलचा असेल, तर फ्रंट कॅमेरा देखील 12 मेगापिक्सेलचा असेल. कंपनीने यावर्षी या मॉडेलचे 25-30 दशलक्ष युनिट्स पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
iPhone SE3 ची फिचर्स
iPhone SE 3 मध्ये, तुम्हाला जाड बेझल्ससह 4.7-इंच डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे मॉडेल पांढऱ्या, काळ्या आणि लाल रंगाच्या पर्यायांसह बाजारात उपलब्ध होईल. लीक झालेल्या फीचर्सनुसार, iPhone SE 3 चा लूक iPhone SE 2020 सारखा असेल. नवीन फोनमध्ये तुम्हाला सिंगल बॅक कॅमेरा आणि पॉवर बटण मिळेल. सुरक्षेसाठी फोनमध्ये टच आयडी सेन्सरही देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, या फोनची किंमत 300 डॉलरपासून म्हणजेच जवळपास 23,000 रुपये असण्याचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Samsung Galaxy F23 5G : लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, 'हे' असतील फिचर्स
- OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...
- Instagram Feature : Instagram बंद करतंय 'हे' अॅप, फायदा होणार की नुकसान जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha