Instagram new feature : सोशल मीडिया (Social Media) आणि इन्स्टंट फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामवर (Instagram) यूजर्सची संख्या जसजशी वेगाने वाढतेय. यूजर्स तितकेच या अॅपबद्दल अधिक गंभीर होत चालले आहेत. यूजर्सना आपला प्रोफाईल डीपी, कव्हर फोटो आणि पोस्टसाठी खूप प्लॅनिंग करताना दिसतात. कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी कंटेंटकडे नीट लक्ष दिले जाते. या सगळ्यात यूजर्सचं प्रोफाईल आणि विशेषकरून त्यांचं नाव अतिशय महत्वाचं आहे. खरंतर, यूजर्सचं नाव अगदी सुरुवातीलाच तयार केलेलं असतं. पण नंतर अनेकांना ते बदलण्याची गरज भासते. परंतु पर्याय माहित नसल्यामुळे अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. यावरंच पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं युजरनेम सहज बदलू शकता.


ही पद्धत वापरा :


जर तुम्हाला तुमच्या Instagram प्रोफाईलचे नाव बदलायचे आहे तर या पद्धती फॉलो करा.  



  • जर तुम्ही मोबाईलवर असाल तर प्रथम इन्स्टाग्राम अॅप उघडून लॉग इन करा.

  • खाली प्रोफाईल सेक्शनमध्ये जा (जेथे तुमचा फोटो गोलाकार आकारात ठेवला आहे).

  • आता एडिट प्रोफाईल सेक्शनमध्ये जा.  

  • आता यूजरच्या बॉक्सवर क्लिक करा आणि दुसरे यूजर नेम टाईप करा.

  • त्या बॉक्समध्ये नवीन यूजरचं नाव भरल्यावर उजव्या बाजूला असलेल्या निळ्या चिन्हावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे यूजर नेम बदलले जाईल.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha