Noise New Smartwatch :  Noise ने भारतातील बजेट सेगमेंटमध्ये आपली नवीन स्मार्टवॉच Noise ColorFit Brio लाँच केली आहे. Noise ColorFit Brio या नवीन स्मार्टवॉचमध्ये उत्तम डिझाईन तर आहेच, पण त्यात अनेक मजेदार फिचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. वेळ पाहण्याव्यतिरिक्त, हे स्मार्टवॉच आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेते. याशिवाय, यात 50 स्पोर्ट मोड देखील आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या घड्याळासह क्लाउड बेस्ड वॉच फेस देखील उपलब्ध आहेत, जे आपण आपल्या आवडीनुसार कस्टमाईज करू शकता.


स्पेसिफिकेश


Noise कलरफिट ब्रिओ स्मार्टवॉचमध्ये 1.52-इंच IPS LCD डिस्प्ले आहे. स्मार्टवॉचची पॉली कार्बोनेटपासून बनलेले आहे. यासह, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी एसपीओ 2 सेन्सर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, 24 ×7 हार्ट रेट मॉनिटरिंग देखील उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये डीएनडी मोड आणि क्विक रिप्लाय फीचर देखील आहे. या घड्याळाचे वजन 34 ग्रॅम आहे.


दमदार बॅटरी


Noise ColorFit Brio या नवीन स्मार्टवॉचमध्ये 190mAh ची बॅटरी आहे. यात 10 दिवसांचा बॅकअप आणि 30 दिवसांचा स्टँडबायचा दावा केला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ उपलब्ध आहे. वॉचमध्ये फाईंड फो, सेडेंटरी रिमाइंडर, ड्रिंकिंग वॉटर रिमाइंडर, कॅमेरा कंट्रोल, अॅपल हेल्थ, गुगल फिट इत्यादी चांगले फीचर्स देण्यात आले आहेत.


काय आहे स्मार्टवॉचची किंमत?


Noise ColorFit Brio स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सिल्व्हर ग्रे, जेट ब्लॅक आणि पिंक रंगात हे स्मार्टवॉच उपलब्ध आहे. यावर एक वर्षाची वॉरंटी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, आपण ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील खरेदी करू शकता.
 
नॉईज कलरफिट ब्रिओ स्मार्टवॉच रियलमी आणि शाओमीच्या स्मार्टवॉचशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांनी बजेट सेगमेंटमध्येही आपले मॉडेल लाँच केले आहेत. आजच्या काळात, आता प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे हे स्मार्टवॉच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.