नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. तर काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. त्यामुळे सध्या देशभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे. सध्या आपल्या मुलभूत गरजांमध्ये इंटरनेटचा समावेश झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इंटरनेट आपल्या आयुष्याचा मूलभूत घटक बनला आहे. आज आम्ही तुम्हाला Airtel, Jio आणि Vodafone यांमध्ये दररोज मिळणाऱ्या 3GB डाटा प्लानची माहिती देणार आहोत. या सर्व प्लान्सची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.


जिओचा 3GB डाटा प्लान


जिओकडे सध्या 349 रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. ज्यामध्ये दररोज 3GB डाटा मिळतो. या प्लानची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या पॅकमध्ये जिओ टू जिओसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तर, नॉन-जिओ नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये 1000 मिनट मिळतात. या प्लानमध्ये दररोज 100 फ्री एसएमएस देखील मिळतात. एवढचं नाहीतर या प्लानसोबत जिओ अॅपचं फ्री सब्स्क्रिप्शन मिळतं.


एअरटेलचा 3GB डाटा प्लान


एअरटेलकडे 398 रूपयांचा डाटा प्लान आहे. ज्यामध्ये दररोज 100 एसएमएस फ्री असून अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. या प्लानची वॅलिडिटी 28 दिवसांसाठी आहे. यामध्ये दररोज 3GB डाटा मिळतो. याव्यतिरिक्त या प्लानसोबत झी5 सोबतच एअरटेल एक्सट्रीम आणइ विंक म्युझिकचा फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.


व्होडाफोन 3GB डाटा प्लान


व्होडाफोनच्या 399 रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये 1.5GB+1.5GB डाटा मिळतो. याव्यतिरिक्त या प्लानसोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. एवढचं नाहीतर यामध्ये झी5 आणि व्होडाफोन प्लेचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.


Airtel, Jio आणि Vodafone चे प्लान्स अत्यंत उत्तम आहेत. परंतु, Airtel आणि Vodafone च्या तुलनेत जिओचा प्लान थोडा स्वस्त आहे. यामध्ये आता तुम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की, या तिघांपैकी कोणत्या ब्रँडचं नेटवर्क उत्तम आहे. ज्या कंपनीचं नेटवर्क तुम्ही राहत असलेल्या शहरात उत्तम असेल, तोच प्लान तुम्ही खरेदी करू शकता.


संबंधित बातम्या : 


Royal enfield लॉन्च करणार 250cc इंजिनची नवी बाईक


मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स


Whatsapp Dark mode : व्हॉट्सअॅपचं नवं डार्क मोड फिचर लॉन्च; असं करा अपडेट