उस्मानाबाद : आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्राने आता सणासुदीनंतर ऐन ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्त सवलत देऊ करण्यात आली आहे. स्टॉक क्लिअरन्ससाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना या सवलती देण्यात येत आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये होंडा कंपनीकडून सर्वाधिक पाच लाखांची सूट देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हॅप्पीएस्ट डिसेंबर ऑफरअंतर्गत कार्डवर चार लाख रुपयांची सूट देत आहे. ह्युंडाई आणि टाटा कंपनीकडूनही कार खरेदीवर बंपर सूट घोषित करण्यात आली आहे.

ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना कॅश डिस्काऊंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनससारख्या ऑफर्ससह रोड साईड असिस्टन्स, स्वस्त कर्ज आणि बायबॅकसारख्या ऑफर देत आहे. 2019 हे वर्ष ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी वाहन विक्रीसाठी बहारदार राहिलेला नाही आहे. मागच्या वर्षांच्या तुलनेत यंदा ऑटोमोबाईल कंपन्यांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. तोच फटका भरुन काढण्यासाठी कंपन्यांकडून ऑफर्स देण्यात आल्याचं बोललं जात आहे.



या गाड्यांवर मिळणार खास सूट

मारुती

स्विफ्ट : 52,600
ऑल्टो : 800 ते 55,100
वॅगनआर : 7,000
बलेनो : 32,000

महिंद्रा अँड महिंद्रा

अल्ट्रस : 4 लाख
एक्सयूवी : 500 ते 1.67 लाख
स्कॉर्पियो: 1.30 लाख
बोलेरो : 34100

ह्युंडाई

एलेंट्रा : 2.5 लाख
क्रेटा आणि एक्सेंट :1 लाख
ग्रँड (आय10) आणि सँट्रो : 60,000

टाटा

हॅरियर : 1 लाख
हेक्सा : 1.65 लाख
टियागो पेट्रोल : 25,000
टिगोर: 55,000

हाँडा

सिविक : 2.5 लाख
जॅझ : 50,000
अमेझ : 42,000
सिटी : 45,000