जर तुम्ही युपीआय (UPI), नेटबँकिंग (Netbanking) किंवा मोबाईल बँकिंग (Mobile Banking) वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. अलीकडेच फोनमध्ये Xenomorph बँकिंग अ‍ॅप मालवेअर सक्रिय झाले आहे. हा धोकादायक मालवेअर या महिन्याच्या सुरुवातीला एका सुरक्षा संशोधकाने शोधला होता. संशोधकाच्या म्हणण्यानुसार, हा मालवेअर आतापर्यंत सुमारे 50 हजार अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या बँकिंग अ‍ॅपमध्ये शिरला आहे. 


किती धोकादायक आहे xenomorphs मालवेअर? 


तज्ञांच्या मते, हा मालवेअर बँकिंग अ‍ॅप्समध्ये प्रवेश करून तुमचे लॉगिन तपशील चोरतो. याशिवाय बँकिंगशी संबंधित मेसेजही या मालवेअरद्वारे वाचले जातात. हा मालवेअर मेसेज आणि नोटिफिकेशनमध्ये व्यत्ययही आणू शकतो. हा मालवेअर आपोआप अपडेट देखील होऊ शकतो. म्हणजेच प्रत्येक अपडेटवर त्याची क्षमता आणि गुणवत्तेमध्ये वाढ होईल. बँकिंग व्यतिरिक्त, हे तुमचे वैयक्तिक तपशील देखील चोरू शकते. एकदा हा मालवेअर फोनमध्ये शिरला की, बँकिंग व्यतिरिक्त हा तुमच्या संपूर्ण फोवर देखील नियंत्रण मिळवतो. 


आतापर्यंत या देशांमध्ये पसरला आहे हा मालवेअर 


या मालवेअरने अनेक देशांतील लोकांचे नुकसान केले आहे. एका अहवालानुसार, आतापर्यंत स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम आणि इटलीमध्ये हा मालवेअर पसरला आहे. 


अशी घ्या काळजी...



  • कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. ईमेलमध्ये स्पॅम आणि संशयास्पद मेल दिसल्यास ते उघडणेही टाळा.

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक चांगला अँटीव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करा.

  • फोन वारंवार हँग होत असल्यास, फोन हॅक झाल्याचे इतर कोणतेही संकेत मिळत असल्यास किंवा मालवेअर आले असल्यास, तो त्वरित फॉरमॅट करा.

  • कोणतीही शंका असल्यास फोनवर नेटबँकिंग आणि UPI सारखे अ‍ॅप्स वापरणे टाळा.


महत्वाच्या बातम्या :