नवी दिल्ली : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये PUBG हा गेम भारतामध्ये बॅन करण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांतच PUBG सारखाच Battleground Mobile India हा गेम 2 जुलै 2021 ला लॉंच करण्यात आला. या गेमने देखील PUBG सारखेच सर्वांच्या मनात घर केले. पण हा गेम आपण ॲंड्रॅाइड सॅाफ्टवेअर मध्येच वापरू शकतो. यामुळेच बऱ्याच ios वापरकर्त्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. ios च्या वापरकर्त्यांना कधी हा गेम खेळायला मिळणार याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. पण आता याबाबत उत्सुकता जवळपास संपुष्टात आली आहे.


इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत…Battleground Mobile India हा गेम लॉंच केलेला आज जवळजवळ एक महिना झाला. अवघ्या काही दिवसातच या गेमच्या फॅन्सने या गेमला पसंती मिळवून दिली. हा गेम वापरणाऱ्यांची संख्या 50 लाख इतकी झाली आहे. त्यामुळे  Battleground Mobile India या गेमचे शोधक क्राफ्टन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत असे लिहीले आहे की, 50 लाख युजर्स होण्याच्या आनंदात आम्ही लवकरच ios सॅाफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी हा गेम सुरू करणार आहोत. तरीही याची तारीख अद्यापही स्पष्ट झालेली नाही.


50 लाखाहून अधिक वापरकर्ते असलेला हा गेम जेव्हा सुरू करण्यात आला त्यावेळी काही बक्षिसं ठरवण्यात आले होते. ते असे की, इतके युजर्स झाले की असे रिवार्ड्स देण्यात येणार.ज्यावेळेस या गेमचे 40 लाख वापरकर्ते पूर्ण होतील त्यावेळेस त्या त्या प्लेअर्स ला एकप्रकारे रिवार्ड म्हणून एक कुपन देण्यात आले.  50 लाख युजर्स होणार त्यावेळेस गॅलेक्सी मेसेंजर सेट देण्यात येईल. असे या कंपनीचे निर्माता क्राफ्टन यांनी सांगितले. हे रिवार्ड मिळवण्यासाठी एक महिना असणार आहे. त्यातच आता ios या सॅाफ्टवेअर मध्ये Battleground Mobile India हा गेम खेळण्यासाठीचे चाहते उत्सुक आहे.