व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी प्रत्येकवेळी काही ना काही नवीन गोष्टी घेऊन येतो. अलीकडे बऱ्याच प्रतीक्षेनंतर व्हाट्सअॅपने डिजिटल पेमेंट्स सेवा सुरू केली आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या 400 कोटी यूजर बेसपैकी दोन कोटी ग्राहकांसाठी ही सेवा नुकतीच सुरू केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर ज्यांची डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू झाली आहे अशा लोकांमध्येही तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर आपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन पेमेंट करणार असाल तर या गोष्टी नक्कीच जाणून घ्या.

Continues below advertisement

तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असावा जर आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट सेवा वापरायची असेल तर आपला मोबाईल नंबर बँक खात्याला जोडलेला असावा. यानंतर आपल्याला प्रथम आपले बँक खाते जोडावे लागेल आणि यूपीआय पिन सेट करावा लागेल. आपल्याकडे आधीपासून यूपीआय पासकोड असल्यास आपण तो वापरू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सुविधा यूपीआयवर काम करते गुगल पे, फोन पे, भीम अॅपप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट्सची सुविधा यूपीआय वर कार्य करते. म्हणून आपणास व्हॉट्सअॅप वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या बँक खात्यातून थेट पैसे देऊ शकता. आपण पेमेंटसाठी नोंदणी करता तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन यूपीआय आयडी तयार करेल. आपण अ‍ॅपच्या पेमेंट्स विभागात जाऊन हा आयडी पाहू शकता.

Continues below advertisement

इतर अॅप्स असणाऱ्यांनाही पैसे पाठवू शकता भीम, गूगल पे किंवा फोन पे सारख्या इतर अ‍ॅप्स वापरणाऱ्या युजर्सलाही आपण व्हॉट्सअॅप पेमेंटद्वारे पैसे पाठवू शकतो. जर युजर्सकडे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सवर नोंदणी केली नसली तरीही ते पैसेही ट्रान्सफर करु शकते. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने “enter UPI ID”चा पर्याय दिला आहे. भीम, गुगल पे, फोन पे किंवा अन्य यूपीआय आयडी देऊनही पैसे पाठवता येतात.

लिमीट आणि चार्जेस यूपीआयसाठी एक लाख रुपयांच्या व्यवहाराची मर्यादा आहे. जे व्हॉट्सअ‍ॅपवरही लागू होते. यूपीआय ही एक विनामूल्य सेवा आहे आणि या व्यवहारासाठी आपल्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे, यूपीआय अॅप्स आपल्याला लोकांचे बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड नोंदवून पैसे पाठविण्याची परवानगी देतात. दरम्यान, हे वैशिष्ट्य अद्याप व्हॉट्सअॅपवर आले नाही.

ही सुविधा केवळ भारतातच उपलब्ध व्हॉट्सअॅपची सुविधा फक्त भारतीय बँक खात्यांशी जोडलेल्या भारतीय फोन नंबरसाठी वापरली जाऊ शकते. बर्‍याच लोकांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप असतात. हे लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकणार नाहीत.