Cheapest Daily Plan : काही प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांनी (Reliance Jio, Vodafone Idea आणि Airtel) प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. पण या कंपन्यांच्या  पॉकेट फ्रेंडली प्लॅन्स अनेकांना जाणून घ्याचे असेल. जाणून घेऊयात डेटा आणि कॉलिंगचे काही पॉकेट फ्रेंडली प्लॅन्सबाबत...


Jio Plan 
डेटा आणि कॉलिंगचा जिओचा 149 रूपयांचा पॉकेट फ्रेंडली प्लॅन्स आहे. या प्लॅनमध्ये एक जीबी डेटा मिळणार आहे. या जिओ कंपनीच्या प्लॅनची वॅलिडीटी 20 दिवस आहे. यानुसार ग्राहकांना एकूण 20 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या डेटामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100  SMS देखील मिळणार आहे. त्याच बरोबर तुम्हाला   JioTV, JioCinema, JioSecurityआणि JioCloud या अॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील मिळते. 


Airtel Cheapest Plan 
एअरटेल कंपनीचा हा प्लॅन 2009 रूपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 21 दिवसांसाठी 1 जीबी डेटा मिळतो. यानुसार एकूण 21 जीबी डेटा तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणार आहे. 2009 रूपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS देखील मिळणार आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर  प्राइम व्हिडीओचे मोबईल अॅडिशन, फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्यूझिक यासारखे अॅप्स तुम्हाला वापरता येणार आहेत.   


Vi Cheapest Plan
व्होडाफोन कंपनीचा हा प्लॅन 199 रूपयांचा आहे. या प्लॅनची वॅलिडीटी 18 दिवस आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला एट जीबी डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड कॉलिंह आणि 100  SMS देखील या प्लॅनमध्ये मिळणार आहे. त्याच प्रमाणे  Vi Movies & TV Basic अॅपचा अॅक्सेस देखील तुम्हाला मिळेल. 


महत्त्वाच्या बातम्या :


iPhone : मास्क घातल्यानंतही फेस आयडी वापरून आयफोन करा अनलॉक; काय आहे अॅपलचं नवं फिचर


Pegasus Spyware : सावधान! तुमच्या व्हॉट्सअॅपलासुद्धा हॅक करू शकते Pegasus Spyware,हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घ्या


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha