Honor X8 5G Launch : Honor ने Honor X8 5G स्मार्टफोनची पहिली झलक दाखवली आहे. Honor कंपनीने हा डिव्हाईस Honor X8 चे 5G व्हर्जन सादर केला आहे. हा स्मार्टफोन जास्त पॉवरफुल हार्डवेअरसह येईल असा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ SoC सह येऊ शकतो तर स्नॅपड्रॅगन 680 SoC चिप त्याच्या पूर्वीच्या 4G मॉडेलमध्ये देण्यात आली होती. Honor X8 5G मध्ये 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले मिळू शकतो. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 48-मेगापिक्सलची मुख्य लेन्स असेल. यात 5,000mAh बॅटरीसह 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देणार असल्याचे सांगितले आहे.
Honor X8 5G+ फिचर :
- Android 11 वर आधारित Magic UI 4.2 Honor X8 5G मध्ये सपोर्ट करण्याची शक्यता आहे.
- Honor X8 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus (720x1,600 pixels) डिस्प्ले मिळू शकतो.
- Snapdragon 480+ प्रोसेसर Honor X8 5G मध्ये Adreno 619 GPU आणि 6GB RAM सह दिसू शकतो.
- कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. त्याच्या सपोर्टमध्ये डेप्थ सेन्सर आणि मॅक्रो शूटर देखील दिला जाऊ शकतो.
- सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, Honor X8 5G ला f/2.0 लेन्ससह 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो.
- कनेक्टिव्हिटीसाठी, Honor X8 5G ला 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.1, GPS / A-GPS आणि USB टाईप-सी पोर्ट दिले जाऊ शकते.
- Honor X8 5G च्या सेन्सर्समध्ये एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाईट सेन्सर, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर दिले जाऊ शकतात.
- सुरक्षिततेसाठी, Honor X8 5G मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आढळू शकतो.
- Honor X8 5G मध्ये, 5,000mAh बॅटरीसह 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.
Honor X8 5G ची किंमत :
Honor X8 5G च्या किंमतीबाबत कंपनीकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. कंपनी लवकरच या स्मार्टफोनची किंमत जाहीर करेल. कलर ऑप्शन बद्दल बोलायचे झाले, तर हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर्स मध्ये लॉन्च केला जाईल.
महत्वाच्या बातम्या :