Download Pan Card : महत्वाच्या सरकारी कामासाठी पॅन कार्डची मागणी केली जाते. मग ते बॅंकेचे खाते उघडणे असो किंवा नोकरीचा शोध. प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड गरजेचेच आहे. अनेकदा तर काही कामासाठी पॅन कार्ड हवे असते. मात्र, घरी विसरल्याने वेळीच पॅन कार्ड मिळणे कठीण होते. अशा वेळी जर पॅन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्याकडे पीडीएफ किंवा तुमच्या पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी असणे आवश्यक आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पॅन कार्ड कसे डाऊनलोड करावे याच्या काही सोप्या स्टेप्स जाणून घ्या.


NSDL किंवा UTIITSL च्या मार्फत पॅन कार्ड बनवतात 


NSDL आणि UTIITSL द्वारे पॅन कार्ड तयार केले जाते. तुमच्‍या पॅनकार्डच्‍या मागील बाजूस तुमच्‍या पॅनकार्ड कोणत्‍या विभागाने बनवले आहे ते तपासावे. त्यावर आधारित, तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.


NSDL कडून बनवलेले पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे?



  • https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर क्लिक करून अधिकृत सरकारी वेबसाइटवर जा.

  • येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील - पावती क्रमांक आणि पॅन क्रमांक. पॅन वर टॅप करा.

  • यानंतर, तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाका आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.

  • त्यानंतर तुमची जन्मतारीख टाका.

  • आता कॅप्चा भरा.

  • सर्व तपशील भरा आणि सबमिट वर टॅप करा.

  • OTP साठी, ईमेल किंवा मोबाईल पर्यायावर टॅप करा.

  • OTP एंटर करा आणि Validate वर क्लिक करा.

  • आता तुम्हाला स्क्रीनवर PDF किंवा XML स्वरूपात ई-पॅन कार्ड दिसेल. कोणत्याही फॉरमॅटवर क्लिक करा आणि तुमच्या फोनमध्ये पॅन कार्ड डाउनलोड करा.


UTIITSL वरून बनवलेले पॅन कार्ड कसे डाऊनलोड करावे?



  • https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCheckCard.action या लिंकवर क्लिक करून पॅन कार्डसाठी अधिकृत सरकारी वेबसाइटला भेट द्या.

  • आता 10 अंकी पॅन क्रमांक टाका, त्यानंतर जन्माचा महिना आणि वर्ष टाका.

  • नंतर कॅप्चा भरा आणि सबमिट करा.

  • OTP साठी, तुम्ही ईमेल किंवा मोबाईलवर OTP जनरेट करण्याचा पर्याय निवडा.

  • OTP एंटर करा आणि सबमिट वर टॅप करा.

  • आता तुमचे पॅन कार्ड तुमच्या फोनमध्ये आपोआप डाउनलोड होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे पॅन कार्ड जुने असेल तर ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 8.26 रुपये मोजावे लागतील.


महत्वाच्या बातम्या :