नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून स्मार्टफोनमध्ये डार्क मोड फिचर फार लोकप्रिय झालं आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि ट्विटरवरही डार्क मोड ऑप्शन युजर्सना उपलब्ध करून देण्यात आला आहे. एवढचं नाहीतर अॅन्ड्रॉइड 10 मध्ये गुगलने सिस्टम-व्हाइड डार्क मोडचा ऑप्शन दिला आहे. एकीकडे डार्कमोडमुळे फोनची बॅटरी दीर्घकाळ चालते आणि स्क्रिन पाहताना त्रासही होत नाही. तर दुसरीकडे डार्कमोडमुळे अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. ज्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
सध्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या अॅप्ससाठी डार्कमोड फिचर ट्रेन्डिंगमध्ये आहे. डार्क मोड ऑन झाल्यानंतर स्मार्टफोनचा डिस्प्ले डार्क म्हणजेच, ब्लॅक कलरमध्ये दिसू लागतो. ज्यामुळे डोळ्यांवर कमी प्रकाश पडतो. परिणामी बराच वेळ तुम्ही न थकता फोनचा वापर करू शकता. परंतु, डार्क मोड दिवसा ठिक वाटतं, तर रात्री मात्र नुकसानदायी ठरतं.
डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम
जर तुम्ही बऱ्याच काळापासून आपल्या स्मार्टफोनवर डार्क मोड फिचरचा वापर करत असाल तर त्यानंतर तुमच्या डोळ्यांना त्याची सवय होते. व्हाइट कलरमध्ये टेक्स्ट वाचणं आवडतं. परंतु, जेव्हा तुम्ही लाइट मोडवर जाता, त्यावेळी याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो. तसेच दृष्टी कमजोर होतं. डार्क मोडचा अति वापर डोळ्यांच्या आजाराचं कारण ठरतं. लाइटपासून डार्क टेक्स्टमध्ये स्विच केल्यानंतर तुमचे डोळे अचानक झालेला बदल स्विकारू शकत नाहीत. अशातच ब्राइटबर्नची स्थितीही दिसू शकते.
डोळ्यांमध्ये अस्टिगमेटिज्म होऊ शकतो.
अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनने सांगितल्यानुसार, डार्क मोडचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये अस्टिगमेटिज्म नावाचा आजार असल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये एक डोळा किंवा दोन्ही डोळ्यांच्या कॉर्नियाचा आकार काही प्रमाणात बदलून जातो आणि युजरला काहीसं धुसर दिसू लागतं. त्यामुळे अनेकजण व्हाइट बँकग्राउंडवर ब्लॅक टेक्स्टच्या तुलनेत ब्लॅक बॅकग्राउंडवर व्हाइट टेक्स्ट सहजपणे वाचू शकत नाही. डिस्प्ले ब्राइट असल्यामुळे आयरिस लहान होतं, ज्यामुळे कमी प्रकाश डोळ्यांवर पडतो. डार्क डिस्प्लेच्या बाबतीत हे उलटं होतं. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
अशावेळी काय कराल?
डोळ्यांना जर डार्कमोड मुळे नुकसान होऊ द्यायचं नसेल तर डार्क मोड आणि लाइट मोडमध्ये स्विच करत रहावं. जेवढं शक्य असेल तेवढं स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा ब्राइटनेस कमीच ठेवावा. दिवसा लाइट मोडचा तर रात्री डार्क मोडचा वापर करणं फायदेशीर ठरेल.
(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या :
Zoom व्हिडीओ कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Facebook ने लॉन्च केली नवी सर्विस
Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर
YouTube ने भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलं UPI पेमेंट फिचर