नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशातच अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. त्यामुळे अनेक लोक सोशल नेटवर्किंग साइट्सचा जास्त वापर करत आहेत. तसेच अनेक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सचाही वापर केला जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे ऑफिसच्या कामासाठी किंवा मित्रमंडळींशी कनेक्ट राहण्यासाठी झूम आणि इतर अॅप्सचा अनेकजण वापर करत आहेत. अशातच फेसबुकही आपल्या युजर्ससाठी एक फिचर घेऊन आलं आहे. ग्रुप व्हिडीओ कॉल करण्यासाठी फेसबुकने एक मेसेन्जर फिचर लॉन्च केलं आहे.
फेसबुक मेसेन्जर रूममध्ये एकाच वेळी 50 लोक जोडले जाणार आहेत. फेसबुक मेसेन्जर रूममार्फत अगदी सहजपणे लोकांशी कनेक्ट होता येणार आहे. एवढचं नाहीतर युजर्सना यातील मेसेंन्जर रूमच्या इन्वाइटला कोणत्याही न्यूज फीड, ग्रुप किंवा इव्हेंटमार्फत शेअर करणं शक्य होतं. यामध्ये युजर्स आपल्या सोयीनुसार रूम क्रिएट करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या फिचरमध्ये प्रत्येकाच्याच प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे.
Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर
मॅसेन्जर रूम प्रायव्हसीच्या अंतर्गत युजर्सने क्रिएट केलेली रूम कोण पाहू शकतं यावर पुर्णपणे युजर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच तुम्ही क्रिएट केलेली रूम लॉक किंवा अनलॉक करू शकता. रूमची लिंक असणारा कोणताही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतो. तर इतरांसोबतही रूम शेअर करू शकतो. परंतु, कॉल क्रिएट करण्यासाठी रूम क्रिएटर उपस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडीओ चॅटमध्ये कोण सहभागी होणार याचा कंट्रोल रूम क्रिएटरकडे असणार आहे.
रूम क्रिएटरजवळ कोणत्याही युजरला या चॅटमध्ये सहभागी करण्याची किंवा चॅटमधून काढून टाकण्याचे अधिकार असणार आहेत. लोक फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी या रूमला रिपोर्टही करू शकतात. त्यानंतर नियमांचं उल्लंघन करणारा युजर व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
अशी तयार करा फेसबुक मॅसेंजर रूम
1. मेसेंजर अॅप ओपन करा.
2. स्क्रिनच्या खाली उजव्या बाजूला पिपुल टॅबवर टॅप करा.
3. क्रिएट रूमवर क्लिक करा आणि त्या लोकांना सिलेक्ट करा. ज्यांना तुम्हाला कॉलमध्ये सहभागी करायचं आहे.
4. ज्या लोकांकडे फेसबुक अकाउंट नाही, त्यांच्यासोबत जोडण्यासाठी या रूमची लिंक शेअर करणं शक्य होणार आहे. तुम्ही तुमची न्यूज फीड, ग्रुप आणि इव्हेंटमध्येही रूम शेअर करू शकता.
दरम्यान, तुम्ही तुमचा फोन किंवा कम्प्युटरच्या माध्यामातून रूममध्ये सहभागी होऊ शकतात. फेसबुकनुसार, काहीही डाऊनलोड करण्याची गरज नाही. फेसबुक इन्स्टाग्राम डायरेक्ट, व्हॉट्सअॅप आणि पोर्टलवरही रूम क्रिएट करण्यासाठी पर्याय देण्याची प्लानिंग करत आहेत. यामध्ये 14 कॅमेरा फिल्टर आणइ चेंजेबल बँकग्राउंड यांसारख्या सुविधा आहेत.
संबंधित बातम्या :
YouTube ने भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलं UPI पेमेंट फिचर
Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर
5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य