नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकार लोकांना घरीच राहण्याचं आवाहन करत आहे. त्याचसोबत कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्सही दिल्या जात आहेत. कोरोना व्हायरस महामारीपासून बचाव करण्यासाठी गुगलनेही पुढाकार घेतला आहे. गुगलने कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या कोरोना वॉरियर्ससाठी गुगल डुडलची एक खास सीरिज तयार केली आहे. ज्यातून गुगलने कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला आहे.


गुगलने आजही एक खास डुडल तयार केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा लोकांना कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्स सांगितल्या आहेत. गुगलने आपल्या नावातील एक-एक लेटर घेऊन खास संदेश दिला आहे.


गुगलच्या या डुडलमध्ये G शब्द पुस्टक वाचत आहे, O शब्द गाणं गात आहे आणि दुसरा O शब्द गिटार वाजवत आहे. याव्यतिरिक्त G शब्द फोनमध्ये व्यस्त आहे. L घरात वर्कआउट करत आहे. तर E फोनवर गप्पा मारत आहे. गुगले या डुडलमार्फत सर्वांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.


गुगलने या डुडलवर क्लिक केल्यानंतर या सर्व टिप्स हिंदीमध्ये सांगण्यात आल्या आहेत. ज्यांमध्ये लिहिलं आहे, घरीच राहा, सुरक्षित अंतर ठेवा. हात सतत धुवा, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा. आजारी आहात? लगेच हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. याआधीही गुगलने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्स दिल्या आहेत.


Google Doodle | गुगलचं 'कोरोना वॉरियर्स'साठी खास डुडल


दरम्यान, गुगलने कोरोना व्हायरसबाबत खास डुडल्सची सीरिज केली आहे. याआधी गुगलने शिक्षक, फऊड सर्विस देणारे कर्मचारी, लोकांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवणारे पॅकेजिंग, शिपिंग आणि डिलीवरी वर्कर्सना धन्यवाद दिलं होतं. याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानण्यासाठी वेगवेगळे डुडल तयार केले होते. त्याचबरोबर एका डुडलमार्फत जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टीप्सही दिल्या होत्या.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर

Apple ने लॉन्च केला स्वस्त iPhone SE, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर?

5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य