Happy New Year Google Doodle : आज 31 डिसेंबर. 2021 या वर्षाचा शेवटचा दिवस. सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा करत आहेत. इंटरनेट सर्च इंजिन असलेलं गूगल (Google)आज जगातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. नुकतचं गूगलनं एक खास डूडल शेअर करून सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात या डूडलबद्दलच्या खास गोष्टी...
गूगल डूडलच्या खास गोष्टी
गूगलनं आज न्यू इयर सेलिब्रेशन या थीमचं डूडल शेअर केलं आहे. या डूडलमध्ये मेणबत्ती, स्पार्कल, कॅन्डी आणि लाइट्स आहेत. न्यू इयर इव्हसाठी हे डूडल तयार करण्यात आहे. गूगलचे हे डूडल रात्री 12 वाजता लाइव्ह झाले. गूगल डूडलमधील google लेटरमधील O या लेटमध्ये एका कॅन्डीचे डिझाइन आहे. तर G या लेटरला पार्टी हॅट घालण्यात आली आहे. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता ही कॅन्डी पॉप होणार आहे. या डूडलवर क्लिक केल्यावर तुम्हाला स्क्रिनवर स्पार्कल्स दिसतील.
डूडलसोबत दिला खास मेसेज
' इट्स अ रॅप फॉर 2021, हॅप्पी न्यू इयर इव्ह!' असा मेसेज गूगल डूडलनं त्याच्या डूडलमधून दिला आहे. असं म्हणलं जातयं की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गूगल डूडलचं डिझाइन हे साधे ठेवण्यात आले आहे.
वेगवेगळ्या थीमवर आधारित असलेले गूगल डूडल्स नेहमीच यूझर्सचे लक्ष वेधत असतात. काही दिवसांपूर्वी गूगलने खास डूडल तयार केले होते. या डूडलमध्ये गूगलने पॉप्यूलर 'पिझ्झा मेन्यू' ची माहिती दिली होती.
इतर बातम्या :
Happy New Year 2022: हटक्या पद्धतीने द्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पाठवा भन्नाट स्टिकर्स आणि जीआयएफ
Happy New Year 2022: नवे वर्ष, नवी आशा; नववर्षासाठी करा 'हे' सोपे संकल्प
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha