Lata Mangeshkar Music App : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना त्यांच्या अप्रतिम आवाजामुळे भारताची नाइटिंगेल म्हटले जाते. अनेक दशकांच्या कारकिर्दीत, लता मंगेशकर यांनी मोठ्या प्रमाणात गाणी गायली आहेत जी त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात राहतील. लता मंगेशकर यांची गाणी आजही तरुण पिढीला आकर्षित करतात. लता मंगेशकर या भारतातील महान आणि प्रभावशाली गायिका होत्या. लग जा गले, गुम है किसी के प्यार में, कोरा कागज था ये मन मेरा, तेरे बिना जिंदगी से कोई अशा काही लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. आता आम्ही तुम्हाला टॉप पाच अॅप्सची नावं सांगणार आहोत. ज्यामधून तुम्ही लतादीदींच्या आठवणींना उजाळा देऊ शकता.


लतादीदींची गाणी तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल अॅप्सद्वारेही ऐकू शकता. हे अॅप्स Android डिव्हाईससाठी Google Play Store वरून डाऊनलोड केले जाऊ शकतात. तर iPhone वापरकर्ते अॅप स्टोअरवरून अॅप डाउनलोड करू शकतात. 


Wynk Music : लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी ऐकण्यासाठी तुम्ही अॅप्लिकेशन वापरू शकता. अॅपने 'remembering lata mangeshkar' नावाची प्ले लिस्ट देखील तयार केली आहे. यामध्ये लतादीदींच्या टॉप गाण्यांची लिस्ट आहे. तुम्ही हे अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. 


Spotify : हे सर्वात लोकप्रिय म्युझिक स्ट्रीमिंग अॅप्सपैकी एक आहे. तुम्ही अॅप्लिकेशन वापरून तुमचे आवडते अल्बम, गाणी, कलाकार आणि बरेच काही ऐकू शकता. या अॅपवर गाणी तुम्ही विनामूल्य ऐकू शकता. तर तुम्ही मेंबरशिप रक्कम भरून प्रीमियममध्ये अपग्रेड देखील करू शकता. हे अॅप Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते.


JioSaavn : हे भारतातील आणखी एक टॉप रेट केलेले संगीत अॅप आहे. जे संगीताचा प्रचंड संग्रह ऑफर करते. संगीताचा आस्वाद घेण्यासोबतच तुम्ही गाण्याचे बोलही पाहू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. 


Gaana Music : हे एक ऑनलाईन म्युझिक अॅप्लिकेशन आहे ज्याचा वापर करून तुम्ही नवीन हिंदी, पंजाबी, तेलुगु, तमिळ आणि इतर प्रादेशिक गाणी ऐकू शकता. या अॅपमध्ये रेडिओ स्टेशन देखील आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. 


Amazon Music : या अॅपसह, तुम्ही जगातील विविध शैली आणि प्रदेशांमधील गाणी, अल्बम, कलाकार आणि बरेच काही आनंद घेऊ शकता. अॅपमध्ये लता मंगेशकर यांची गाणी आहेत. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha