Google Maps Update : जगातील सर्वात मोठी सर्ज इंजिन कंपनी गूगलने ( Google ) स्ट्रीट व्यू च्या वर्धापन दिनानिमित्त मोबाईल अॅपसाठी हिस्टोरिकल स्ट्रट व्यू हे फीचर्स आणले आहे.  याशिवाय गुगल मॅपमध्ये युजर्ससाठी नवीन कॅमेराही उपलब्ध होणार आहे. गूगल कंपनीने 100 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील 220 अब्ज फोटोंचे स्ट्रीट व्यू फीचर  Android आणि iOS प्लॅटफॉर्मसाठी आणले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यूजर्स या फिचरच्या प्रतिक्षेत होते.   


स्ट्रीट व्यू फीचर म्हणजे काय? काय होणार फायदा?
गूगलने त्यांच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, स्ट्रीट व्यूच्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यात अनेक नवीन फीचर्स समाविष्ट केले जात आहेत. स्ट्रीट व्यू फीचरमध्ये अनेक  सुधारणा केल्यामुळे Android आणि iOS प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ते अनेक वर्षांपासूनचे जुने ऐतिहासिक स्ट्रीट व्यू (रस्त्यांसह अनेक  फोटो) फोटो पाहू शकतील. एखाद्या ठिकाणाचे स्ट्रीट व्यू पाहताना वापरकर्ते फोटोवर कुठेही टॅप करून त्यांना हव्या असणाऱ्या स्थानाची माहिती मिळवू शकतील. 


गूगलने जुन्या स्मार्टफोनमधील गूगल मॅपची सुविधा गेल्या  वर्षापासून बंद केली आहे. जुन्या मोबाईलमध्ये गूगल मॅपची सुविधा वापरायची असेल तर त्यासाठी कमीत-कमी 3.0 हनीकॉम्ब इंस्टाल  करणे आवश्यक आहे. 


कसे पाहाल जुने फोटो?


गुगल मॅप ओपन केल्यानंतर आधी तुम्हाला स्ट्रीट व्यूचा सपोर्ट असलेल्या ठिकाणी जावे लागेल. स्ट्रीट व्यू ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर दाखवलेल्या इमेजेसच्या कोणत्याही भागावर क्लीक करावे लागेल, त्यामुळे तुम्हाला हवे असलेल्या लोकेशनची माहिती स्क्रीनवर दिसेल. यानंतर यूजर्स ऐतिहासिक फोटो पाहण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार तारीख निवडू शकतील. 2007 मध्ये गूगलने मॅपची सुविधा सूरू झाली आहे. त्यामुळे 2007 पासून आतापर्यंतचे फोटो तुम्हाला पाहाता येणार आहेत. 


स्ट्रीट व्यू पाहण्यासाठी कॅमेरा 
जून्या रस्त्यांसंबंधित अधिक डेटा सहजपणे संकलित करण्यासाठी गूगलने नवीन पोर्टेबल कॅमेरा आणला आहे. या कॅमेऱ्याच्या  मदतीने यूजर्स अॅमेझॉन जंगल आणि इतर दाट लोकवस्तीच्या ठिकाणांचे चांगल्या गुणवत्तेच्या फोटोंचे संकलन करू शकतील. 
 
रस्त्यावरील वाहतूक कोंडीची मिळणार माहिती 


गूगलने आणलेल्या नवीन फिचर्समुळे चालकांना प्रवास करत असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झालीय का? किंवा मार्गावर अजून कोणत्या प्रकारचा अडथळा आहे का? याची देखील माहिती मिळणार आहे. याबरोबरच महामार्गावरील विविध सूचनांसाठी करण्यात आलेल्या मार्किंगची देखील माहिती समजणार आहे.