मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठी भाषेवरुन मनसेने अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. अशा परिस्थितीत अ‍ॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनं मात्र मराठीचा स्वीकार केल्याचं दिसून आलंय. याच पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देत मराठीत पोस्ट करत मराठीजनांना साद घातली आहे.


फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय बाजारपेठेने मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. यासह फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे.

MNS vs Amazon : मनसेचं अमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक, पुणे आणि मुंबईतील कार्यालयं फोडली

प्लिपकार्टचं ट्विट..
प्लिपकार्टने आज 'कस काय! असं ट्विट करत अंदाज लावा की अॅपमध्ये नवीन काय आहे?. या पोस्टमधील फोटोमध्ये मराठी भाषेचा पर्याय दिसत आहे. या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि बोली भाषेतील अनुभव देण्यासाठी 54 लाखांहून अधिक शब्दांचे कंपनीमार्फत भाषांतर आणि लिपित लेखन करण्यात आले आहे. ई-कॉमर्स मंचाच्या ‘लोकलायझेशन अ‍ॅण्ड ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म‘वर उपलब्ध ही सुविधा ग्राहकांना सहजसुंदर अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.