मुंबई : स्वदेशी मोबाईल मॅन्युफॅक्चर लावा इंटरनॅशनलने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने जगातील पहिला कस्टमाइजेबल स्मार्टफोन सादर केला आहे. जो ग्राहकांची गरज आणि त्यांच्या आवडीनुसार कलर, कॅमेरा, मेमरी, स्टोरेज कपॅसिटीची सिलेक्शन करण्याची संधी देण्यात आली आहे.


11 जानेवारीपासून होणार विक्री


लावा इंटरनॅशनलचे डायरेक्टर आणि बिजनेस हेड सुनील रैना यांनी बोलताना सांगितलं की, कस्टमायजेबल स्मार्टफोन सीरीज, ज्याचं ब्रँड नाव एमवायझेड आहे. हा कंपनीने स्वदेशी प्लांटमध्ये तयार केला असून याची विक्री 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे.


66 कॉम्बीनेशन करु शकणार सिलेक्ट


सुनील रैना यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "जगातील पहिला कस्टमायजेबल स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना कॅमेरा, रॅम, रॉम आणि कलरच्या 66 कॉम्बिनेशन्सपैकी एक सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे." त्यांनी सांगितलं की, कंपनीने यावर्षी नवीन प्रोडक्ट पोर्टफोलियोसोबत पाच टक्के बाजारात भागीदारी मिळवण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे.


Z Series चे 4 मॉडल लॉन्च


Lava ने भारतात Z Series अंतर्गत चार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मेड इन इंडियाचे फोन लेटेस्ट फिचर्ससोबत मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीने Lava Befit SmartBand देखील लॉन्च केलं आहे. कंपनीचा दावा आहे की, Z Series चे सर्व स्मार्टफोन उत्तम फिचर्ससोबत लॉन्च केले आहेत.


Micromax सोबत स्पर्धा


Lava च्या या स्मार्टफोन्सची टक्कर Micromax सोबत होणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वदेशी कंपनी Micromax ने स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन मिड रेंज आणि बजेट सेगमेंट अंतर्गत लॉन्च करण्यात आला होता. Micromax ने IN सीरीज लॉन्च केली आहे. ज्यामध्ये पहिला फोन In Note 1 आणि तर दुसरा फोन IN 1B आहे. जो एन्ट्री लेव्हल सेगमेंटचा स्मार्चफोन आहे.